मुंबई : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर यांच्या लग्नाला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले. लग्नाला सहा महिने पूर्ण झाल्यानिमित्ताने त्याने आपल्या बायकोसोबत हे सेलिब्रेशन केले. इन्स्टाग्रामवर त्याने प्रियंकासोबतचा फोटो शेअर करताना “Happy 6 months my permanent roommate.” असं म्हटलंय. टाईम्स ऑफ इंडिया डॉट कॉमशी बोलताना शशांक म्हणाला, ज्या दिवशी आमच्या लग्नाला सहा महिने झाले त्यादिवशी मी तिला भेटू शकलो नाही. कार ती मुंबईत होती आणि मी पुण्यात होते. मात्र अॅनिर्व्हसरीच्या एक दिवस आधी आम्ही सिंगापूरमध्ये होतो. त्याला प्रियंकाबद्दल सगळ्यात जास्त काय आवडते असं विचारलं असता शशांक म्हणाला, आमचं लग्न झाल्यापासून आतापर्यंत ती चार ते पाच वेळा ऑफिसमधून लवकर घरी आली माझ्या आवडीची डिश बनवण्यासाठी. प्रियंका अद्याप जेवण बनवण्यास शिकतेय. ती नेहमी माझ्यासाठी काहीतरी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करत असते आणि हीच गोष्ट मला खूप आवडते.
अॅनिर्व्हसरीच्या गिफ्टबद्दल शशांकला विचारले असता तो म्हणाला, मी तिच्यासाठी तिच्या फेव्हरिट ब्रँडचा नेकलेस गिफ्ट म्हणून घेतलाय. शशांक आणि प्रियंका यांनी गेल्या वर्षी ४ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. प्रियंका वकील आहे. तिची शशांकशी ओळख सोशल मीडियाद्वारे झाली.