Sharmila Tagore On Strong Role : बॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) लोकप्रिय आहेत. आजही त्यांचे लाखो चाहते आहेत. शर्मिला सगळ्यात शेवटी 2010 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दिसल्या होत्या. आता शर्मिला या तब्बल 13 वर्षांनंतर 'गुलमोहर' (Gulmohar) मधून पडद्यावर पुनरागमन करत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी खुलासा केला की त्यांच्यासारख्या अभिनेत्रीसाठी स्ट्रॉंग भूमिका लिहिल्या जात नाहीत. यावेळी त्यांनी अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अनुपम खेर (Anupam Kher) यांची नाव घेत, त्यांच्यासाठी खास स्क्रिप्ट लिहिली जाते असा दावा केला आहे.
शर्मिला टागोर यांनी ही मुलाखत 'पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी शर्मिला टागोर यांनी यावेळी नीना गुप्ता यांचे कौतुक देखील केले आहे. नीना गुप्ता यांच्याविषयी बोलताना शर्मिला टागोर म्हणाल्या की वयाच्या 63 व्या वर्षी त्या अप्रतिम भूमिका करत आहेत. पण त्यांच्या वयाच्या भूमिका नसल्याबद्दल शर्मिला खंत व्यक्त करत म्हणाल्या, मेरिल स्ट्रीप, ज्युडी डेंच आणि मॅगी स्मिथ यांसारख्या हॉलिवूडमधील या अभिनेत्रींच्या तुलनेत बॉलिवूडमधील वयस्कर अभिनेत्रींना खूप कमी आणि चांगल्या अशी भूमिका आहेत.
हेही वाचा : Swara Bhaskar आणि फहाद अहमद यांचं लग्न वैध नाही; बरेलीच्या मौलाना यांचं मोठं वक्तव्य
शर्मिला टागोर म्हणाल्या, 'आम्ही (बॉलिवूड) अजूनही थोडे जुन्या पद्धतीचे आहोत, विशेषत: महिलांबाबत कारण खूप स्ट्रॉंग भूमिका या फक्त पुरुषांकडे जातात. जसे की अमिताभ बच्चन, अनुपम खेर यांच्यासाठी स्पेशल स्क्रिप्ट लिहिल्या जातात. दुसरीकडे वहीदा रहमान यांच्यासाठी किंवा कोणत्याही वयस्कर अभिनेत्रींसाठी अशा स्क्रिप्ट लिहिल्या जात नाही. चित्रपट हा प्रेक्षकांना दाखवण्यात येतो त्यामुळे त्याचे सगळे पैशांचा देखल विचार करावा लागतो. प्रेक्षक हे चित्रपटगृहापर्यंत पोहोचायला हवे. हा असाच प्रश्न आहे जिथे आधी कोंबडी की अंड? या प्रश्नावर निर्णय हे चित्रपटसृष्टीतील कॅप्टन करतील. पण सध्या गोष्टी बदलत आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की मॅच्युअर कलाकार आहेत.
शर्मिला टागोर यांनी पुढे नीना गुप्ता यांचे कौतुक केले आणि म्हणाल्या, 'आता नीना गुप्ता यांच्यासारख्या अनेक अप्रतिम कलाकार आहेत. त्याच्याशिवाय इतरही अनेक कलाकार आहेत. OTT हे अशा प्रतिभावान कलाकारांनी भरलेले आहे. थोडा वेळ लागेल, पण हे नक्कीच बदलेल.'
शर्मिला यांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्या 'गुलमोहर' या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबत मनोज वाजपेयी देखील दिसणार आहेत. मनोज वाजपेयी हे शर्मिला यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे.