श्रद्धा साकारणार सायनाची भूमिका...

खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा सध्याचा ट्रेंड आहे. धोनी, सचिन त्यानंतर अभिनव बिंद्रा आणि आता सायना नेहवाल. सिनेमात सायनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारणार आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 8, 2017, 11:11 PM IST
श्रद्धा साकारणार सायनाची भूमिका...  title=

मुंबई : खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याचा सध्याचा ट्रेंड आहे. धोनी, सचिन त्यानंतर अभिनव बिंद्रा आणि आता सायना नेहवाल. सिनेमात सायनाची भूमिका श्रद्धा कपूर साकारणार आहे. त्यासाठी श्रद्धा घाम गाळताना दिसत आहे. श्रद्धाने नुकताच सायनासोबतचा बॅडमिंटनचा सराव करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. सायनाची खेळण्याची पद्धत, देहबोली यातील बारकावे ती शिकत आहे. त्याचबरोबर सायनाने तिला काही  महत्त्वाच्या टिप्स देखील दिल्या आहेत. 

सुरुवातीला हे भूमिका दीपिका पदुकोण साकारणार असल्याचे म्हटले जात होते. पण नंतर दीपिकाला डावलून श्रद्धाला पसंती देण्यात आली. दीपिकाचे नाव जरी या सिनेमातून वगळण्यात आले तरी अजूनही तिचे कनेक्शन या सिनेमाशी असल्याचे दिसून येते.या सिनेमासाठी श्रद्धा फक्त सायनाकडूनच प्रशिक्षण घेतेय असे नाही तर ती दीपिका पदुकोणचे वडील प्रकाश पदुकोण यांच्याकडूनही बॅडमिंटनचे धडे गिरवत आहे. मुंबई मिररने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, श्रद्धा नियमित त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यास जाते. सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली नसली तरी श्रद्धाचे प्रशिक्षण मात्र सुरू झाले आहे. श्रद्धाच्या करिअरसाठी हा फार महत्त्वाचा सिनेमा मानण्यात येतो.

 

Today training with the champ herself @nehwalsaina 

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

कोणत्याही खेळाडूच्या आत्मचरित्रपटात काम करताना त्यासाठी इतर सिनेमांपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागते. अमोल गुप्ते दिग्दर्शित या सिनेमाचे नाव अजून ठरले नसून पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचे अधिकतर चित्रीकरण मुंबई आणि हैदराबाद येथे होणार आहे.
पुढल्या वर्षी सायना नेहवालचा हा बायोपिक येणार तर दुसरीकडे श्रद्धाचा सुपरस्टार प्रभाससोबतचा ‘साहो’ हा दाक्षिणात्य सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने पुढील वर्ष श्रद्धासाठी फारच महत्त्वपूर्ण असणार आहे.