...म्हणून शाहरुखनं 'खिलजी'ची भूमिका करण्यास दिला होता नकार!

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' अखेर प्रदर्शित झालाय... या सिनेमात दीपिका आणि शाहीदपेक्षा 'खिलजी'च्या नकारार्थी भूमिकेत रणवीर सिंह भाव खाऊन गेलाय. पण, या भूमिकेसाठी अगोदर शाहरुखला विचारणा करण्यात आली होती, हे तुम्हाला माहीत आहे का?

Updated: Jan 26, 2018, 04:01 PM IST
...म्हणून शाहरुखनं 'खिलजी'ची भूमिका करण्यास दिला होता नकार! title=

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'पद्मावत' अखेर प्रदर्शित झालाय... या सिनेमात दीपिका आणि शाहीदपेक्षा 'खिलजी'च्या नकारार्थी भूमिकेत रणवीर सिंह भाव खाऊन गेलाय. पण, या भूमिकेसाठी अगोदर शाहरुखला विचारणा करण्यात आली होती, हे तुम्हाला माहीत आहे का?

मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमासाठी शाहिद आणि रणवीर पहिली पसंत नव्हते... शाहिदनं पार पाडलेली भूमिकेसाठी निर्मात्यांनी अगोदर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखकडे विचारणा केली होती. परंतु, या सिनेमाची कहाणी केवळ अलाउद्दीन खिलजी आणि रानी पद्मावतीच्या अवती-भवती फिरत असल्याचं लक्षात आल्यानंतर शाहरुखनं ही भूमिका नाकारली. 

आणखी वाचा : ...असा घेणार करणी सेना भन्साळी यांच्या 'पद्मावत'चा बदला!

त्यानंतर भन्साळी यांनी शाहरुखला खिलजीच्या भूमिकेसाठीही विचारणा करून पाहिली... परंतु, शाहरुखनं याही भूमिकेला नकार दिला. सूत्रांच्या माहितीनुसार, खिलजीच्या भूमिकेवर वादंग उठू शकतो, याचा अंदाजा शाहरुखला अगोदरच आला होता. शाहरुखला 'रईस'मधल्या भूमिकेवरून आलेला अनुभव होताच... त्यामुळे त्याने स्पष्ट शब्दांत ही भूमिकादेखील नाकारली. 

आणखी वाचा : 'भन्साळींचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाख बक्षीस देणार'