बिग बी शाहरुखचे वडील; आता अबरामची समज कोण काढणार?

अबरामची ही निरागसता तुम्हाला देखील भावेल 

बिग बी शाहरुखचे वडील; आता अबरामची समज कोण काढणार?  title=

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या मुलीचा आराध्याचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा झाला. या वाढदिवसाचे असंख्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या बर्थ डे पार्टीला अनेक स्टार्स आपल्या मुलांसोबत हजर होते. शाहरूख आणि अबराम देखील या पार्टीला पोहोचले होते. बिग बी यांनी या पार्टीतील एक खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि एक मजेशीर गोष्ट देखील. 

अबराम अमिताभ बच्चन यांना शाहरूख खानचे वडिल समजतो. आणि तो त्यांच्याकडे आजोबा या नात्यानेच वावरत असतो. बिग बींनी शेअर केलं आहे की, शाहरूखचा लहान मुलगा अबराम याला पूर्णपणे असं वाटतं की, मी शाहरूखचे वडिल आहे. आणि त्याला एकच प्रश्न सतत सतावत आहे. तो म्हणजे मी शाहरूखच्या घरी का नाही राहत. 

बिग बींनी शेअर केलेल्या या फोटोत अबराम त्यांना भेटत आहे. त्याच्या नजरेतील ती निरागसता सगळ्यांनाच अचंबीत करणारी आहे. आजोबा असून हे आपल्या घरी का राहत नाहीत? असा अगदी निरागस प्रश्न त्याला पडला आहे. आणि तो यासंदर्भात आजोबा अमिताभ बच्चन यांच्याशी बोलत आहे. 

शाहरूखने या अगोदर केला होता खुलासा 

गेल्यावर्षी देखील अमिताभ बच्चन यांनी आराध्याच्या बर्थ डे पार्टीतील शाहरूख आणि अबराम यांचा फोटो शेअर केला होता. यावेळी ते अबरामला शुगर कँडी देताना दिसत होते. त्यांनी लिहिलं होतं... म्हातारीचे केस कुणाला आवडतात? त्याला मी या स्टॉलवर घेऊन गेलो. 

या फोटोखाली किंग खानने रिप्लाय देऊन बिग बींचे आभार मानले होते. तो म्हणाला होता की, अबराम हे क्षण लक्षात ठेवेल. असं ही तो जेव्हा पण तुम्हाला टीव्हीत पाहतो तेव्हा त्याला असं वाटतं की, तुम्ही माझे वडिल आहात.