बिग बींच्या 'त्या' एका गोष्टीमुळे किंग खान शाहरूखच्या मनात भीती

त्याला वेळोवेळी अनेक महत्त्वाचे सल्ले आणि सूचनाही देतात.

Updated: Jul 31, 2022, 07:18 PM IST
बिग बींच्या 'त्या' एका गोष्टीमुळे किंग खान शाहरूखच्या मनात भीती title=

Shah Rukh Khan & Amitabh Bachchan :  'कभी खुशी कभी गम'मधून अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांनी एकत्र काम केले. ते दोघेही एकमेकांच्या कामाचे कौतुक करतात. दोघांमध्ये खूप छान बाँडिंग आहे. बिग बी अनेकदा शाहरुखची स्तुती करताना दिसत असतात पण त्याहूनही ते त्याला वेळोवेळी अनेक महत्त्वाचे सल्ले आणि सूचनाही देतात.

'मोहब्बतें', 'वीर-जारा', 'कभी अलविदा ना कहना', 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटांतून अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान यांनी काम केले. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या 'डॉन' या बिग बिगच्या हिट चित्रपटाचा सिक्वेलही किंग खानने केला आहे.

अलीकडेच शाहरुख खानने एका मुलाखतीदरम्यान अमिताभ बच्चन यांच्याशी संबंधित एक मजेशीर किस्सा सांगितला. शाहरुख खानने अमिताभ बच्चन यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्यांबद्दल सांगितले परंतु हा सल्ला ऐकून तो इतका घाबरला की त्याने स्टार न बननण्याचा निर्णय घेतला. शाहरुखच्या म्हणण्यानुसार अमिताभ यांनी सांगितलेली गोष्ट त्याच्यासाठी फारच भितीदायक होती, ते त्याला म्हणाले, 'जसा तू आता मोठा स्टार आहेस, तू जे काही करशील ते चुकीचेच असेल. तर पहिली गोष्ट म्हणजे काही चूक झाली तर हात जोडून माफी माग'.

''त्यावेळी मी खूप नवीन होतो म्हणून मी म्हणालो.. पण अमितजी मी काही चूक केली नाही तर? यावर बिग बी म्हणाले, 'मी तेच बोलतोय, माफी माग आणि त्यांच्यासमोर झुकायची तयारी ठेव.' त्याचे शब्द ऐकून मला खूप भीती वाटली, इतकी की यापुढे मला आता स्टार व्हायची इच्छाच उरली नाही. मी विचार केला की हे सर्व माझ्या बाबतीत घडले तर मी काय करू? असा प्रश्न मी अमिताभजींनाही केला पण ते मात्र यावर काहीच बोलले नाहीत.'', असं शाहरूखने स्पष्ट केले. 

शाहरूखला बीग बींचा महत्त्वपुर्ण सल्ला...
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांना सल्ला दिला होता की, 'नेहमी नम्र राहा आणि कोणी तूझे पाय खेचायचा प्रयत्न करेल तर त्यांचा फार विचार करू नको. तू मोठा स्टार आहेस, तू जे काही करशील ते नेहमीच जगाला चुकीचे वाटेल. तेव्हा आपले प्रयत्न कधीच चूकवू नकोस..