शाहरुख खानकडून फॅनला चक्क शिवीगाळ! म्हणाला, 'तेरी...'

Shah Rukh Khan : शाहरुख खाननं त्याच्या चाहत्यांशी Ask SRK च्या माध्यमानं चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी अनेकांनी शाहरुखला विचित्र प्रश्न विचारले आहेत. त्यावेळी शाहरुखनं एका चाहत्याचा खरंच शिवीगाळ केली की काय...

दिक्षा पाटील | Updated: Aug 11, 2023, 03:26 PM IST
शाहरुख खानकडून फॅनला चक्क शिवीगाळ! म्हणाला, 'तेरी...' title=
(Photo Credit : Social Media)

Ask SRK Session on Twitter: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान  (Shah Rukh Khan ) हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे.  त्याच्या जवान या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. तर काल अचानक शाहरुखनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांशी संपर्क साधला आहे. यावेळी शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यापैकी एका चाहत्यानं शाहरुखला शिवीगाळ करण्यास सांगितले. शाहरुखनं त्याच्या चाहत्याची ही इच्छा पूर्ण केली आणि हटके अंदाजात शिवीगाळ केली आहे. 

शाहरुखनं त्याच्या चाहत्यांशी ट्विटर अकाऊंटवरून संपर्क साधला यावेळी त्यानं AskSRK हे सेशन घेतलं आहे. यासोबतच शाहरुखनं त्याच्या 'जवान' या चित्रपटाचं पोस्टर देखील प्रदर्शित केलं. यावेळी त्याच्या चाहत्यांशी संपर्क करत असताना एका नेटकऱ्यानी अनेक विचित्र प्रश्न विचारले. यावेळी एका चाहत्यानं शाहरुखला चक्क मला शिवीगाळ कर अशी विनंती केली. शाहरुखनं त्याच्या चाहत्याची ही इच्छा पूर्ण केली. त्या चाहत्यानं ट्वीट करत शाहरुखला विनंती केली की कमीत कमी शिवीगाळ तरी कर, पण रिप्लाय कर. चाहत्याची अशी विचित्र मागणी पाहता शाहरुखनं त्याला रिप्लाय केला. हसत हसत शाहरुख म्हणाला की 'तेरी बात का बैदा मारूं। मी ही शिवी जॅकी श्रॉफ यांच्याकडून शिकली. हाहाहा।' शाहरुख खाननं जॅकी श्रॉफ यांच्याकडून ही शिवी शिकल्याचा खुलासा केला आहे. 

Shah Rukh Khan asksrk

एका चाहत्यानं शाहरुखला त्याच्या जवान या चित्रपटातील सगळ्यात आवडतं गाणं कोणतं असा सवाल केला. त्यावर उत्तर देत शाहरुख खान म्हणाला, माझं या चित्रपटातलं चलेया हे रोमॅन्टिक गाणं आवडतं आहे. ते माझ्यासारखंच रोमॅन्टिक आणि जेन्टल आहे.

asksrk Shah Rukh Khan

आणखी एका चाहत्यांनं शाहरुखला या सेशन दरम्यान, त्याने लिहिले की, 'मी प्रेयसीला जवान पाहायला जाऊ असे म्हटले. त्यावर ती माझा जवान तर तूच आहेस. मला शाहरुखला बघायचे नाही. यावर खोडकर उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, 'ठीक आहे भाऊ, तिचे ऐक. चिपटाची पटकथा दुसऱ्या कोणाकडून तरी ऐक. तिला विचारा त्याचा दुसरा चित्रपट पाहणार का. त्याचं नाव डंकी नाहीतर त्यालापण म्हणेल तू डंकीसारखा दिसतोस.'

हेही वाचा : नव्या दिशाला डेट करण्यावर टायगर श्रॉफचं खळबळजनक वक्तव्य म्हणाला, '2 वर्षांपासून...'

'जवान' विषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट पुढच्या महिन्यात 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत नयनतारा आणि विजय सेतुपती स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगु चित्रपटात प्रदर्शित होणार आहे.