'मी काजोलसोबत बेडवर...', शाहरुख म्हणतो फसवणूक करणं आपल्या हातात

चांगली मैत्रीण म्हणता म्हणता शाहरुखनं काजोलसोबत 'हे' काय केलं....   

Updated: May 31, 2022, 09:57 AM IST
'मी काजोलसोबत बेडवर...', शाहरुख म्हणतो फसवणूक करणं आपल्या हातात title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री काजोल यांच्या नात्याबद्दल अनेकांना माहिती आहे. रुपेरी पडद्यावर एखादी जोडी हीट झाली, तर खऱ्या आयुष्यातही दोघे एकमेकांना डेट करत असतील... असा अंदाज वर्तवण्यात येतो. शाहरुख आणि काजोल यांच्याबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या. शाहरुख आणि काजोलला त्यांच्या नात्याबद्दल देखील अनेकदा विचारण्यात आलं. तेव्हा शाहरुखचं लग्न झालं. दरम्यान एका मुलाखतीत शाहरुखने अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला. 

सिनेमांध्ये महिला कलाकार आणि काजोलसोबत असलेल्या नात्याबद्दल शाहरुख म्हणाला, 'काजोल आणि मी... ती एक छोटी मुलगी आहे. तनुजा यांची मुलगी आहे. काजोल माझ्या लहान बहिणीसारखी आहे. गौरीला देखील काजोल फार आवडते...'

पुढे शाहरुख म्हणाला, 'जूही, माधुरी, मनीषा, शिल्पा, सोनाली, नगमा आणि उर्मिला अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. पण यापैकी कोणासोबत बेडवर झोपलो नाही. काजोल सोबत देखील नाही...'

सेटवर अभिनेत्रींसोबत असलेल्या नात्याबद्दल सांगितल्यानंतर, शाहरुख म्हणाला, 'जर माझं कोणासोबत अफेअर असेल तर मी इतका हुशार आहे, की माझ्या नात्याबद्दल कोणाला काहीही कळणार नाही...'

'जुहीसोबत सिनेमा केल्यानंतर तिच्या आणि माझ्या नात्याची चर्चा होऊ लागली. म्हणून जुहीने माझ्यासोबत काम करणं बंद केलं.' असं देखील शाहरुख म्हणाला. लग्नानंतर अफेअरच्या चर्चांमुळे वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणी येतात. 

त्यामुळे यासर्व प्रकरणांवर स्पष्ट मत असणं फार गरजेचं असतं, पण फसवणूक करणं फक्त माणसाच्याच हातात असतं.. असं देखील शाहरुख याठिकाणी  म्हणाला.