Har Ghar Tiranga : शाहरुख खानच्या 'मन्नत'वर फडकला तिरंगा

15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. 

Updated: Aug 14, 2022, 11:59 PM IST
Har Ghar Tiranga : शाहरुख खानच्या 'मन्नत'वर फडकला तिरंगा title=

मुंबई : 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत भारत सरकारने 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केलं आहे. या मोहिमेंतर्गत सर्वांनी या मोहिमेत सहभागी व्हावं. मग ते सामान्य असो वा कोणी खास. यामध्ये शाहरुख खानचंही नाव जोडलं गेलं आहे. शाहरुख खानने आपल्या घरावर तिरंगा लावून संपूर्ण कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. जो चर्चेत आहे.
 
गौरी खानने शेअर केला फोटो
प्रसिद्ध इंटिरियर डिझायनर आणि शाहरुख खानची पत्नी गौरी खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर तिच्या घराच्या छतावर तिरंगा लावून फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं,  'तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा.'

या फोटोमध्ये शाहरुख खान आणि गौरी खान व्यतिरिक्त आर्यन खान आणि त्याचा लहान मुलगा अबराम तिरंग्यासमोर दिसत आहेत. यावेळी चौघंही पांढऱ्या रंगाच्या पोशाखात दिसले. गौरी डेनिम जीन्ससोबत पांढरा ब्लेजर परिधान करताना दिसली. तर शाहरुख, आर्यन आणि अबराम पांढऱ्या टी-शर्टसह डेनिम जीन्समध्ये दिसले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा फोटो शेअर करत किंग खान 'हर घर तिरंगा' मोहिमेत सामील झाला आणि स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करणारा एक फोटो शेअर केला. अभिनेत्याने हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी अभिनेत्याचं कौतुक करण्यास सुरुवात केली. शाहरुख खानच्या आधी आमिर खान, सलमान खान, हृतिक रोशन, कार्तिक आर्यन आणि अमिताभ बच्चन या सेलिब्रीटींनी घरावर तिरंगा लावत 'हर घर तिरंगा' या मोहिमेत सहभाग घेतला आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहरुख खान त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात किंग खानसोबत दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहे.