फोटो : सुहाना खानचा आपल्या फ्रेण्ड्ससोबत बोल्ड आणि बिंदास्त अंदाज

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान स्टार किड्समध्ये सर्वात प्रसिद्ध आहे.

Updated: Oct 4, 2018, 07:48 AM IST
फोटो : सुहाना खानचा आपल्या फ्रेण्ड्ससोबत बोल्ड आणि बिंदास्त अंदाज  title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान स्टार किड्समध्ये सर्वात प्रसिद्ध आहे. कोणत्याही सिनेमात येण्याआधीच तिचे फॉलोअर्स वाढताना दिसताहेत. सध्या ती लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करतेय तसंच आपल्या फ्रेंड्सना वेळ देतेयं. नुकतेच तिने वोग मॅग्झिनसाठी फोटोशूट केलं होतं. हे लोकांच्या खूपच पसंतीस पडलं. तिचा एक फोटोही सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोयं. यामध्ये ती बोल्ड आणि बिंदास्त लूक मध्ये दिसत आहे. या फोटोत तिने स्लीवलेस ग्रे कलरचा समर ड्रेस घातला आहे. तिची स्माईल पाहून ती किती बिंदास्त असू शकते याचा आपण अंदाज लावू शकतो.

डान्स आवडतो  

 
 
 
 

A post shared by Suhana (@suhanakhan143) on

 सुहानाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, वोग मॅगझीनच्या कव्हर फोटोच्या शूटवेळी तिला भरपूर मजा आली. जेव्हा तिला डान्स करायचा होता तो भाग खूप मजेशीर असल्याचं म्हटलं होतं. मला डान्स करायला भरपूर आवडतो. मला खूप आनंद आहे की, माझे पालक हा प्रोजेक्ट माझ्याकडे घेऊन आले. 

हळूहळू या क्षेत्राकडे  

 
 
 
 

A post shared by Suhana khan (@suhana_khan_officiall) on

'मी अभिनय क्षेत्राबद्दल कधीच विचार केला नव्हता.  हळूहळू या क्षेत्राकडे वळली आहे. मात्र माझ्या आई वडिलांना याची जाणीव झाली की मी परफॉर्मन्स चांगला करत असल्याचे' सुहाना सांगते. शाहरूख खानचा मुलगा आणि सुहानाचा भाऊ आर्यन यावेळी लॉस एंजलिसमध्ये फिल्ममेकिंगच शिक्षण घेत आहे. सुहाना आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लॉस एंजिलसमध्ये आपल्या भावासोबत अभिनयाचा शॉर्ट टर्म कोर्स करत आहे.