पक्के वैरी ते सख्खे शेजारी, आता किंग खान राहणार भाईजानच्या शेजारी

किंग खान शाहरुख मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा पठान या सिनेमांच्या निमित्ताने सिनेविश्वात कमबॅक करणार आहे.

Updated: Jul 22, 2021, 06:39 PM IST
पक्के वैरी ते सख्खे शेजारी, आता किंग खान राहणार भाईजानच्या शेजारी title=

मुंबई : किंग खान शाहरुख मोठ्या ब्रेकनंतर आता पुन्हा एकदा पठान या सिनेमांच्या निमित्ताने सिनेविश्वात कमबॅक करणार आहे. सिनेमाचं शुटींग पुढील महिन्यात मुंबईमध्ये करण्यात येणार आहे. तर भाईजान सलमान खान त्याच्या टायगर सिनेमाच्या सीरीजमधील पुढील सिनेमाचं शुटींग काही दिवसातच सुरु करणार आहे.

 महत्त्वाची बाब सांगायची झाली, तर शाहरुख आणि सलमान या दोघांच्या आगामी सिनेमांचे भव्य सेट हे मुंबईतील मेहबुब स्टुडिओ येथे बनवण्यात येणार आहेत. 

त्यामुळे सलमान खान आणि शाहरुख खान अगदी शेजारी-शेजारी असलेल्या त्यांच्या सेटवर सिनेमाचं शुटींग करणार आहेत. चर्चा आहे की, बॉलिवूडचे हे दोन शुटींगदरम्यान तिथेच राहणार देखील आहेत. त्यामुळे दोघांना एकत्र राहण्यासाठी खास घरं देखील सेटजवळ बनवण्यात आलं आहे. 

सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात ऑफ स्क्रिन चांगलीच मैत्री आहे. त्यांच्यातील बॉण्डिंग बऱ्याचदा अवॉर्ड फक्शनमध्ये दिसून येते. आपआपल्या सिनेमांच्या शुटींगच शेड्यूल पुर्ण करत लवकरच दोन्ही खान आपले दमदार सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.