'त्या' ब्रेकअपनंतर दीपिका पदुकोणला आजही वाटतेय 'या' गोष्टीची भीती

दीपिका पादुकोण आज एक टॉप क्लास अभिनेत्री आहे. 

Updated: Jul 22, 2021, 06:06 PM IST
'त्या' ब्रेकअपनंतर दीपिका पदुकोणला आजही वाटतेय 'या' गोष्टीची भीती title=

मुंबई : बॉलिवूडची सुपरस्टार दीपिका पादुकोणने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्याबद्दल खुलेपणाने बोलते. ती कायम आपल्या मानसिक आरोग्य आणि नैराश्याबद्दलचे आपले अनुभव शेअर करते. आता पुन्हा एकदा 'व्हॉईस चॅट रूम' सत्रादरम्यान, तिने नैराश्याच्या वाईट अवस्थेतून जात असताना तिची आई तिच्या कशी पाठिशी खंबीरपणे उभी होती याबद्दल खुलासा केला आहे.

इतकी सोपी नव्हती वेळ
दीपिका पादुकोण आज एक टॉप क्लास अभिनेत्री आहे. यासोबतच ती यशस्वी विवाहित जीवनही जगत आहे. मात्र दीपिकाने तिच्या आयुष्यात वाईट वेळेचासुद्धा सामना केला आहे. एक वेळ अशी होती जेव्हा विनाकारण तिला बर्बाद झाल्यासारखं वाटत होतं

आईला समजल्या वेदना 
त्या काळात ती आतून तुटली होती. पण त्यावेळी इतर कोणीही नव्हतं मात्र तिच्या आईला ही समस्या समजली आणि तिने ती व्यवस्तितपणे हाताळली. त्या वाईट काळाविषयी बोलताना दीपिका म्हणाली, 'माझी आई उज्वला पादुकोण माझ्या रडण्याच्या पद्धतीमुळे समजून गेली होती की, मी कामाचं टेन्शन किंवा नॉर्मल बॉयफ्रेंड इश्यू किंवा ब्रेकअपपेक्षा जास्त त्रासात आहे.

फेब्रुवारी 2014 मध्ये सुरू झालं डिप्रेशन
दीपिका पादुकोण मेंटल हेल्थ आणि डिप्रेशन बद्दल खुलेपणाने बोलत राहते. पण यावेळी पुन्हा एकदा ती जुन्या आठवणीत गेली आणि भावनिक झाली. 'व्हॉईस चॅट रूम' सत्रादरम्यान दीपिकाने माहिती दिली की फेब्रुवारी 2014 मध्ये माझं डिप्रेशन सुरू झालं. माझ्या आयुष्यातील हा एक काळ होता जेव्हा मी पूर्णपणे आतून तुटले होते. असं वाटत होतं की, आयुष्याला काहीच अर्थ नाही. ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर होत होती.

रडताना पाहून आईला समजली तिची स्थिती 
दीपिका पादुकोण पुढे म्हणाली, 'हे सगळं बरेच दिवस, आठवडे आणि महिने चालू होतं. दरम्यान, माझे कुटुंब मला भेटायला मुंबईत आलं. पण जेव्हा कुटुंबातील सदस्य परत जात होते आणि त्यांचं पॅकिंग करीत होते, तेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले आणि अचानक रडायला लागले. मला रडताना पाहून आईला सगळं काही समजलं. तिला माहित होतं की, मी संकटात सापडली आहे. तर आईने मला विचारलं काय झालं? पण मी सांगू शकले नाही. पण हा माझ्या आईचा अनुभव आणि प्रिजेंस ऑफ़ माइंड होतं, ज्यामुळे मी या समस्येपासून मुक्त होऊ शकले.