मुंबई : अभिनेत्री शहनाज गिल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर शहनाज नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर शहनाजचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. शहनाजने बॉलिवूडमध्ये 'किसी का भाई किसी की जान' सिनेमातून पदार्पण केलं आहे. पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत काम केल्यानंतर शहनाज गिलने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली.
या वर्षाच्या सुरुवातीला 'किसी का भाई किसी की जान' रिलीज झाला. सलमान खानसोबत शहनाजने हिंदीमध्ये पदार्पण केलं. आता काही दिवसांपुर्वीच तिने 'थँक यू फॉर कमिंग' या सेक्स कॉमेडीसाठी करण बुलानीसोबत हातमिळवणी केली.. ज्यामध्ये भूमी पेडणेकर, डॉली सिंग, कुशा कपिला आणि शिबानी बेदी यांच्या भूमिका आहेत. मात्र आता शहनाजच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या चित्रपटाचं प्रमोशन करत असताना ती आजारी पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागले.
शहनाज गिल तिच्या गर्ल गँगसोबत तिच्या 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसली होती, जो 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पण या प्रमोशन दरम्यान तिला फुड पॉईजनिंग झालं आहे. प्रमोशन दरम्यान तिने काहीतरी खाल्लं ज्यामुळे तिचे पोट खराब झालं. तिचा त्रास इतका वाढला की, तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शहनाजने तिच्या चाहत्यांना तिच्या तब्येतीची माहिती देण्यासाठी तिच्या अकाउंटवर इन्स्टाग्राम लाइव्ह होस्ट केलं होतं.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. 'बघ प्रत्येकाची वेळ येते, प्रत्येकाची वेळ जाते,' असं ती म्हणताना दिसतेय. माझ्या बाबतीतही असंच घडलं आहे. मी काही दिवसांनी पुन्हा येईल. मित्रांनो, मी आता ठीक आहे. माझी तब्येत बरी नव्हती. मला इन्फेक्शन झालं होतं. मी सँडविच खाल्लं होतं. मला फूड इन्फेक्शन झालं आहे.
शहनाजने इन्स्टा लाइव्हवर तिच्या तब्येतीबद्दल अपडेट केलं असताना, तिचा सह कलाकार आणि बॉलिवूडचे दिग्गज अनिल कपूर यांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे. तिला मुमताज म्हणत अनिल कपूर यांनी शहनाजसाठी लिहिलं आहे की, 'तू मुमताजसारखी आहेस... भावी मुमताज. सगळेजण पाहतायेत. कौतुक करताहेत.
एका व्हिडिओमध्ये रिया कपूर हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी रिया शहनाज गिलच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पोहचली होती. शहनाज गिलचे चाहते सध्या तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये अभिनेत्री लवकरात लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.