मुंबई : शाहिद कपूर आणि मिरा राजपूतने आपल्या नवजात मुलाचं नाव ठेवलं आहे. 5 सप्टेंबरला मिराने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मिरा - शाहीदचं हे दुसरं बाळ आहे. या अगोदर त्यांना मिशा नावाची 2 वर्षांची गोंडस मुलगी आहे. 2015 मध्ये शाहिद - मिराचं लग्न झालं. आणि 2016 मध्ये मिशाचा जन्म झालं. आता 2 वर्षांनी या गोंडस मुलाचं घरात आगमन झालं आहे. दोन वर्षांची मिशा आता मोठी दीदी झाली आहे. एप्रिल 2018 मध्ये या दोघांनी दुसऱ्या बाळाची चाहुल सोशल मीडियावर शेअर केली. यावेळी मिशाच्या फोटोसोबत 'Big Sister' असं लिहून शाहिदने इंस्टाग्रामवर शेअर केलं होतं.
शाहिद - मिराने आपल्या बाळाचं नाव 'झेन' असं ठेवलं आहे. ट्विटरवर त्याने असे म्हणले आहे की, झेन आमच्या आयुष्यात आला आणि आमचं आयुष्य पूर्ण झालं, शुभेच्छा आणि आशिर्वादासाठी आहे.
Zain Kapoor is here and we feel complete. Thank you for all the wishes and blessings. We are overjoyed and so grateful. Love to all.
— Shahid Kapoor (@shahidkapoor) September 7, 2018
मीराची आई बेला, शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर, भाऊ ईशान खट्टर झेनच्या जन्माच्या वेळी रुग्णालयात होते. शाहिद कपूर सध्या पालकत्वाच्या सुट्टीवर असून जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवत आहे. या सुट्टीमुळेच शाहिद कपूरने त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलले आहे.