'वडिलांसोबत कोणत्या चित्रपटात झळकणार अबराम?'

बॉलिवूडचा किंग खान अभिनेता कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. 

Updated: Oct 8, 2019, 07:28 PM IST
'वडिलांसोबत कोणत्या चित्रपटात झळकणार अबराम?' title=

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो नेहमी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सध्या दसऱ्याच्या मुहूर्तावर सोशल मीडियावर #AskSrk हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. याच्या माध्यमातून अनेक चाहते शाहरूख सोबत संवाद साधत आहेत. त्याचप्रमाणे शाहरूखही चाहत्यांच्या सर्व प्रश्नांचे निराकरण करताना दिसत आहे. 

शाहरूखला एका चाहत्याने चक्क अबरामसोबत कधी चित्रपट साकारणार असा प्रश्न विचारला. चाहत्याचे प्रश्नाचे उत्तर देताना शाहरूख गंमतीत म्हणाला, 'जेव्हा अबरामकडून चित्रपटासाठी तारीख मिळेल तेव्हा नक्की चित्रपट करू' असे तो म्हणाला. 

त्यानंतर एका चाहत्याने अबरामला कोणता चित्रपट जास्त आवडतो असा प्रश्न विचारला. तेव्हा अबरामला ''रा.वन" चित्रपट आवडत असल्याचे त्याने सांगितले. 

अभिनायापासून दूर झाल्यानंतर त्याने आपला मोर्चा फिल्म मेकिंगकडे वळवला आहे. त्यामुळे शाहरूख त्याच्या वाढदिवसाच्या दिनी काही मोठी घोषणा करेल असा अंदाज त्याचे चाहते व्यक्त करत आहेत. पुढच्या महिन्यात किंग खानचा वाढदिवस आहे.