'टायगर ३'च्या ओपनिंग सीनचं असेल शाहरुखच्या ''पठाण''शी जबरदस्त कनेक्शन

आजकाल बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री आपल्या आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख सातत्याने जाहीर करतात, जे पाहून प्रेक्षक खूप उत्साही असतात.

Updated: Mar 4, 2021, 07:54 PM IST
'टायगर ३'च्या ओपनिंग सीनचं असेल शाहरुखच्या ''पठाण''शी जबरदस्त कनेक्शन title=

मुंबई : आजकाल बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री आपल्या आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख सातत्याने जाहीर करतात, जे पाहून प्रेक्षक खूप उत्साही असतात. यामध्ये अक्षय कुमार, अजय देवगण यासांरख्या कलाकारांच्या रखडलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. हे रखडलेले चित्रपट प्रेक्षक बघायला उत्सुक आहेत. सलमान खानचे टायगर 3 आणि शाहरुख खानचा पठाण हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे सिनेमे यशवंत बॅनर बनवत आहेत. या दोन चित्रपटांची खास गोष्ट म्हणजे त्यांच्या कथा एकमेकांशी जोडली जाणार आहे.

एका वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी एका अहवालात माहिती दिली होती की, आदित्य चोप्राने निर्णय घेतला आहे की, जेव्हा पठाण सिनेमा जिथे संपेल तिथे सलमान खानची टायगरच्या अवतारात एंन्ट्री घेईल.. याच बरोबर यशराज बॅनरचा स्पाई वर्ल्डचीही सुरुवात होईल.  

पठाण आणि टायगर 3 या चित्रपटाशी संबंधित एका स्रोताने एका वृत्ताला माहिती दिली आहे की, पठाणमध्ये टायगरच्या एंट्रीबरोबरच आदित्य चोप्राने आणखी एक योजना तयार केली आहे, ज्याची अद्याप कुणालाच माहिती नाही.

चित्रपटांशी संबधित एका स्त्रोताने सांगितले आहे की, जिथून पठाण हा चित्रपट संपेल तिथून टायगर 3 ची कथा सुरू होईल. याचा अर्थ पठाण यांच्या कथेचा टायगर 3 च्या सलमानशी जबरदस्त संबंध असेल. 

पठाण चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्यासोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार देखील चित्रपटात दिसणार आहेत. पठाणमध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यात फाईटींग दाखवण्यात येईल असं सांगितले जात आहे. 

यशराज बॅनरच्या पठाणचे फाईट सीन खूप मोठ्या प्रमाणात शूट करण्याचे नियोजन केलं आहे. तसंच बॉक्सऑफिसवर सलमान शाहरुखचे सिनेमे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतील यात काही शंका नाही