'माझा मुलगा...' लेकाबद्दल शाहरुख असं काय म्हणाला, ज्यामुळे गौरी भडकली

आर्यनला होती शाहरुखची साथ? कोणत्या गोष्टीमुळे भडकली गौरी खान   

Updated: Jun 15, 2022, 02:59 PM IST
'माझा मुलगा...' लेकाबद्दल शाहरुख असं काय म्हणाला, ज्यामुळे गौरी भडकली title=

मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि पत्नी गौरी खानची लव्ह स्टोरी प्रत्येकाला माहिती आहे. आज शहरुख आणि गौरीची जोडी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध जोड्यांपैकी एक आहे. शाहरुख आणि गौरीला दोन मुलं आणि एक मुलगी आहे. मुलगा आर्यनच्या जन्मानंतर शाहरुख-गौरीने एका मुलाखतीत हजेरी लावली होती. नोव्हेंबर 1997 मध्ये शाहरुख आणि गौरी सिमी गरेवालच्या शोमध्ये गेले होते. 

मुलाखतीदरम्यान शाहरुखने वडील झाल्याचा आनंद व्यक्त केला. आर्यनने मोठा झाल्यावर त्याला करू इच्छित असलेल्या सर्व गोष्टींबद्दल दोघे बोलले. मुलाखतीत गौरीला विचारण्यात आलं की, आर्यनसाठी तिचे काही खास स्वप्न आहेत का? 

या प्रश्नावर गौरी म्हणाली, मी आर्यनचं भविष्य ठरवू शकत नाही, परंतु त्याने एक चांगला मुलगा व्हावा अशी माझी इच्छा आहे. यानंतर सिमीने गंमतीत सांगितले की, आर्यनकडे शाहरुख वडिलांच्या रूपात आहे, त्यामुळे त्याला जास्त संधी उपलब्ध नसतील?

यावर शाहरुखने गंमतीत म्हटलं की, जर तो चांगला मुलगा निघाला तर त्याला घरातून हाकलून दिलं जाईल. मला असं वाटतं आर्यनने पुर्ण शहराला उद्धवस्त कराव.  त्याचे लांब केस असावेत आणि त्याच्या सतत तक्रारी यायला हव्या.. असं देखील शाहरुख म्हणाला. 

आर्यन खान ड्रग्स प्रकरण
गेल्या वर्षी, NCB ने बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवर ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. मात्र 27 मे रोजी एनसीबीने आर्यन खानला याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. 

यादरम्यान शाहरुख आणि संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र आर्यनला क्लीन चिट मिळाल्यानंतर आता परिस्थिती सुधारली आहे. सुहाना खान लवकरच 'द आर्चीज' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.