"मैं कौन हूं, पुण्य या पाप...", Shah Rukh Khan च्या Jawan चा प्रिव्ह्यू प्रदर्शित

Shah Rukh Khan Jawan Prevue : शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा प्रिव्ह्यू प्रदर्शित झाला आहे. अचानक जवानचा प्रीव्ह्यू आल्यानं शाहरुखच्या सगळ्या चाहत्यांना आनंद झाला आहे. तर या चित्रपटात दीपिका पदुकोणची देखील एक भूमिका आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 10, 2023, 11:32 AM IST
"मैं कौन हूं, पुण्य या पाप...", Shah Rukh Khan च्या Jawan चा प्रिव्ह्यू प्रदर्शित title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan Jawan Prevue : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचे चाहते त्याच्या 'जवान' या चित्रपटाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. इतक्यात शाहरुखनं काल जाहिर केलं होतं की 'जवान'चा प्रिव्ह्यू प्रदर्शित होणार आहे. आधी सगळ्यांना वाटलं की 'जवान'चा टीझर 10 जुलैला प्रदर्शित होणार आहे. पण असं झालं नाही. निर्मात्यांनी प्रेक्षकांना टीझरच्या जागी मोठी भेट दिली आहे. शाहरुखच्या 'जवान' चा प्रीव्ह्यू प्रदर्शित झाला होता. त्यानं सगळ्यांना आनंद झाला आहे. प्रीव्ह्यूमध्ये शाहरुख खाननं सीनमध्ये चेहरा आणि डोक्यावर बांधलेली पट्टी सोडली आहे आणि त्यानंतर त्याचा Bald दिसत आहे. शाहरुखचे या चित्रपटातील लूक हे खूप डेन्जरस दिसले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शाहरुखनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा प्रीव्ह्यू शेअर केला आहे. प्रीव्ह्यू पाहून एक अंदाज बांधला जात आहे की 'जवान' मध्ये शाहरुख खानच्या भूमिका या खूप खतरनाक आणि डेन्जरस असणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच आता मोठी चर्चा सुरु झाली आहे. शाहरुख ज्या प्रमाणे चेहरा आणि डोक्यावरून बॅन्डेज पट्टी काढतो त्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. चित्रपटात शाहरुखचे दमदार डायलॉग आहेत हे आता प्रीव्ह्यूवरून दिसत आहे. कारण त्याची एक छोटी झलक आपल्याला प्रीव्ह्यू मध्ये पाहायला मिळत आहे. शाहरुखचा चित्रपटातील काही दमदार या प्रीव्ह्यूमध्ये पाहायला मिळाले आहे त्यापैकी एक म्हणजे जब मैं विलेन बनता हूं ना, तो मेरे सामने कोई हीरो टिक नहीं पाता है।' तर या चित्रपटात दीपिका पदुकोणची पाहुण्या कलाकाराची भूमिका आहे. दीपिकानं लाल रंगाची साडी नेसली असून त्यात ती अॅक्शक करताना दिसत आहे. तर Nayanthara ही पोलीस अधिकाऱ्याची भूमिकेत दिसत आहे. प्रीव्ह्यूमध्ये मेट्रोच्या आतमधला एक सीन आहे. त्यातील शाहरुखचा लूक चर्चेत आहे. 

हेही वाचा : "दोन दिवस टोमॅटो महाग, मीडियात लईच आग लागलीये'', लाल चिखल म्हणत प्रवीण तरडे यांनी लिहिलेली पोस्ट एकदा वाचाच

'जवान' या चित्रपटाचं दिग्दर्शक अॅटलीनं केलं आहे. चित्रपटात शाहरुखचा डबल रोल आहे. यात नयनतारा, प्रियामणि, सुनील ग्रोव्हर आणि विजय सेतुपति देखील दिसत आहेत. या चित्रपटाचं बजेट हे 220 कोटींचं आहे. तर जवान हा हिंदीत बनवण्यात आला असून इतर भाषांमध्ये संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. 7 सप्टेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटसृष्टीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि रिद्धी डोगरा देखील आहेत. दीपिका आणि संजय दत्त या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.