ट्विटरवर शाहरूखच्या चाहत्यांची संख्या ३.२ कोटींच्या पार

अभिनेता शाहरूख खान हा बॉलिवूडचा बादशाह आहे. ट्विटरवरची त्याची लोकप्रियता पुन्हा नव्या उच्चांकांवर गेली आहे. 

Updated: Jan 2, 2018, 10:38 AM IST
ट्विटरवर शाहरूखच्या चाहत्यांची संख्या ३.२ कोटींच्या पार   title=

मुंबई : अभिनेता शाहरूख खान हा बॉलिवूडचा बादशाह आहे. ट्विटरवरची त्याची लोकप्रियता पुन्हा नव्या उच्चांकांवर गेली आहे. 

ट्विटरवर शाहरूखची लोकप्रियता  

शाहरूख खानने नुकतीच ट्विटरवर ३.२ कोटी फॅन्स  फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे.  त्याचे आभारही शाहरूखने अगदी हटके अंदाजात मानले आहेत. शाहरूख खानच्या नव्या चित्रपटाची नव वर्षाच्या  मुहूर्तावर घोषणा करण्यात आली. 

शाहरूखचा नवा सिनेमा  

शाहरूख खानचा ' झिरो' हा नवा सिनेमा २१ डिसेंबर  २०१८ ला रसिकांसमोर येणार आहे. या चित्रपटाच्या नावाचा वापर करून शाहरूख खानने नवा चित्रपटाचे प्रमोशनही सुरू केले आहे.   

 

 

नवा अंदाज 

व्हिएफएक्स तंत्रज्ञानाची मदत घेऊन शाहरूखला या चित्रपटामध्ये बुटके दाखवण्यात आले आहे. सोबतच पहिल्या टीझरमध्ये हिंदी चित्रपटातील जुन्या गाण्यावर शाहरूख थिरकताना दिसत आहे. ' झिरो' चित्रपटामध्ये शाहरुख सोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ एकत्र दिसणार आहेत.