संजयनं घेतली मुलीची भेट, पत्नी मान्यतानं शेअर केला फॅमिली फोटो

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह आहे.

Updated: Jan 2, 2018, 09:53 AM IST
संजयनं घेतली मुलीची भेट, पत्नी मान्यतानं शेअर केला फॅमिली फोटो title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता सोशल मीडियावर बरीच अॅक्टीव्ह आहे.

काही दिवसांपूर्वीही मान्यतानं पती संजय दत्त आणि आपल्या दोन मुलं मुलगी इक्रा आणि मुलगा शहरानसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर तिनं न्यू ईअरच्या सायंकाळी एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये संजय दत्तसोबत त्याची मोठी मुलगी त्रिशलाही दिसतेय. 

The Dutts!! #aboutlastnight #familytimes #familydinner #love #grace #positivity #dubai #blessed #beautifulife #thankyougod

A post shared by Maanayata Dutt (@maanayata) on

दी दत्त... अशी कॅप्शन मान्यतानं या फोटोला दिलीय. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संजय दत्त आपल्या कुटुंबासोबत दुबईला गेलाय. 

लवकरच, संजय 'साहेब, बीवी आणि गँगस्टर ३' मध्ये दिसणार आहे. याशिवाय तो सध्या 'तारेबाज'च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.