Jawan Review: प्रदर्शनाच्या 2 दिवस आधीच आला रिव्ह्यू! जाणून घ्या कसा आहे चित्रपट अन् किती Stars मिळाले

Jawan Review: शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. त्याच्या दोन दिवस आधीच त्याचा रिव्ह्यू समोर आला आहे. विकेंडला चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर आजचं रिव्ह्यू वाचून ठरवा चित्रपटाची आगाऊ बूकिंग करायची की नाही...

दिक्षा पाटील | Updated: Sep 5, 2023, 11:41 AM IST
Jawan Review:  प्रदर्शनाच्या 2 दिवस आधीच आला रिव्ह्यू! जाणून घ्या कसा आहे चित्रपट अन् किती Stars मिळाले title=
(Photo Credit : Social Media)

Jawan Review:  बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याच्या रिव्ह्यू आला आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर आणि एंटरनेटमेंट पोर्टलनं सोशल मीडियावर या चित्रपटाला रिव्ह्यू दिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी या चित्रपटाला 4 स्टार देखील दिले आहेत. 

चित्रपट प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीच ऑलवेज बॉलिवूड या एक्स अकाऊंटवरून (पूर्वीच्या ट्विटर अकाऊंटवरून) हा रिव्ह्यू दिला आहे. या रिव्ह्यूमध्ये त्यांनी म्हटलं आहे की 'जवान हा खूप सुंदर चित्रपट असून एक क्राइम सिनेमा आहे. यात वेगवेगळे अॅन्गल, एक चांगली पटकथा आणि अप्रतिम सिनेमेटोग्राफी आहे. अॅक्शन कॉमेडी आणि रोमांचक आणि अनेक गोष्टी त्यात पाहायला मिळत आहे. रोमान्स पासून सगळ्याचं एक मस्त पॅकेज आहे. या चित्रपटात शाहरुख खान, विजय सेतुपति आणि अॅटली आपल्याला आपल्या जागेवरून उठू देत नाही आहेत.' 

या पोर्टलनं रिव्ह्यू तर दिला मात्र त्यांच्या रिव्ह्यू कोणत्या आधारावर दिला हे सांगितलं नाही. हा चित्रपट प्रदर्शन होण्याआधीच त्यांनी कसा पाहिला हे सांगितले आहे. 'जवान' साठी कोणताही प्रेस शो आयोजित करण्यात आलेला नाही. तर भारतातील पत्रकार, क्रिटिक्स यांना लवकर हा चित्रपट पाहायला मिळणार नाही अशा चर्चा सुरु आहेत. हाच प्रश्न या पोर्टलनं दिलेल्या रिव्ह्यूनंतर अनेकांनी कमेंट करत विचारला आहे. काहींनी विचारलं की कोणाचा डेब्यू आहे? चित्रपटातं काही चुकिचं वाटलं का? चित्रपट कंटाळवाणा आहे का? इतकंच नाही तर तुम्ही एक स्टार का कमी दिला? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी त्या वेब पोर्टलला विचारले आहेत. 

हेही वाचा : 'जवान'च्या रिलीजआधीच शाहरुखने मानले नाशिककरांचे आभार! कारण...

दरम्यान, शाहरुख खानचे चाहते त्याच्या या चित्रपटाला चांगला रिव्ह्यू मिळाल्यानं आनंदी झाले आहेत. हा चित्रपट ब्लॉक बस्टर हीट होणार असे अनेकांचे म्हणणे आहे. तर त्याच्या काही चाहत्यांचे म्हणणे आहे की 'जवान' हा 'पठाण'चा रेकॉर्ड मोडणार. शाहरुखच्या 'पठाण' या चित्रपटानं जगभरात 1050 कोटींची कमाई केली. तर हा चित्रपट बॉक्स ऑफिस 'पठाण' चाही रेकॉर्ड मोडणार. याच वर्षी शाहरुखचा 'पठाण' हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर 'जवान' प्रदर्शित होणार. अशात एकाच वर्षात शाहरुखचे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडणार की काय याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.