आमिर खान नाही तर 'हा' अभिनेता आहे फातिमा शेखचा आवडता अभिनेता

बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखही अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

सायली कौलगेकर | Updated: Aug 1, 2023, 01:56 PM IST
आमिर खान नाही तर 'हा' अभिनेता आहे फातिमा शेखचा आवडता अभिनेता title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखही अभिनेत्री नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. तर कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. मात्र यावेळी अभनेत्री एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. लवकरच फातिमा मेघना गुलजार यांच्या सॅम बहादुर या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात विक्की कौशल सोबती ती स्क्रिन शेअर करणार आहे. याचबरोबर फातिमा अनुराग बसुच्या मेट्रो या सिनेमात झळकणार आहे. याचबरोबर ती फिलहाल या सिनेमावर काम करत आहे.

फातिमाने 'दंगल' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमानंतर फातिमा घरांघरात पोहचली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये फातिमाने एक आश्चर्यकारक वक्तव्य केलं आहे. तिचे हे वक्तव्य ऐकून तुम्हीही हैराण व्हाल हे नक्की.

फातिमा सना शेखने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, तिचा आवडता अभिनेता शाहरुख खान आहे. एका मुलाखती दरम्यान तिला विचारण्यात आलं की, तिचा आवडता अभिनेता कोण आहे?  आमिर खान की शाहरुख खान? यावर फातिमाने उत्तर देत म्हटलं की,  ''शाहरुख खानची खूप मोठी फॅन आहे. मात्र आमिर खानने  'रंग दे बसंती', 'पीके', 'पीपली लाइव'सारखे एका पेक्षा एक सिनेमा सिनेसृष्टीला दिले आहेत आणि हे सगळे सिनेमा वेग-वेगळे आहेत.'' नुकतीच फातिमाने ह्यूमन ऑफ सिनेमाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलं. 

याचबरोबर फातिमाला पुढे विचारण्यात आलं की, तिला कोणते सिनेमा इंफ्लूएंस करतात? यावंर उत्तर देत ती म्हणाली की, मला कुछ-कुछ होता है सिनेमा खूप आवडतो. आणि म्हणूनच मला शाहरुख खान खूप आवडतो. ज्याप्रकारे शाहरुखने त्या सिनेमात रोमान्स केला आहे. रोमान्स किंवा बदला घेण्याच्या अनेक कल्पना आपण पाहतो. त्यामुळे मलाही असं वाटतं की कोणतरी माझी अशीच काळजी घ्यावी. मला नाही माहिती.

याचबरोबर फातिमाने असंही म्हटलं की, जेव्हा तिचं ब्रेकअप झालं होतं तेव्हा तिने  ब्रेकिंग बँड ही सिरीज पाहिली होती. या सिरीजमुळे तिला तिच्या ब्रेकअपमधून बाहेर पडायला मदत झाली. याआधी फातिमाचं नाव आमिर खानसोबत जोडलं गेल्यामुळे तिने नाराजी व्यक्त केली होती.