VIDEO : 'बऊआ सिंह' बनून शाहरूख सलमानच्या भेटीला

पाहा हा व्हिडिओ

VIDEO : 'बऊआ सिंह' बनून शाहरूख सलमानच्या भेटीला  title=

मुंबई : सलमान खानच्या भेटीला चक्क Zero सिनेमातील 'बऊआ सिंह' भेटायला आला. आपल्याला माहितच आहे झिरो सिनेमात शाहरूख खान बऊआचं कॅरेक्टर साकारत आहे. शाहरूख खान सध्या आपल्या सिनेमाच्या प्रमोशनकरता बिग बॉसमध्ये आला आहे. 

सुरूवातीला बिग बॉसमधील स्पर्धकांना बऊचा आवाज ऐकू आला. आवाज ऐकून सगळेच स्पर्धक खूप गोंधळले. या दरम्यान सुरभिने अंदाज लावत हा आवाज बऊचा आवाज असल्याचं सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@iamsrk & @beingsalmankhan 

A post shared by ️RAEES (@its_raees) on

यानंतर सलमान खानने शाहरूख खानची ओळख बऊआ म्हणून करून दिली. तेव्हा घरातील सर्व मंडळी गोंधळले. शाहरूख देखील यावेळी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांशी अगदी मोकळेपणाने वागत होता. 

डान्स करताना शाहरूख खान आणि सलमान खान वेगळ्याच अंदाजात दिसले. दोन्ही कलाकार अगदी देसी अंदाजात गळ्यात गमझा घालून डान्स करताना दिसले. स्वतः किंग खानने हा फोटो सलमान खानला भाईजान संबोधत शेअर केला आहे.

शाहरूख खानच्या 'झिरो' सिनेमात सलमान खानचा कॅमिओ रोल देखील आहे. त्याचप्रमाणे या सिनेमात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ लीड रोल आहे. नुकतंच या सिनेमातील गाणं देखील रिलीज झालं आहे. इश्कबाजीमध्ये शाहरूख आणि सलमान एकत्र दिसत आहेत. 

या सिनेमात शाहरूख खान 40 वर्षांच्या माणसाची भूमिका साकारत आहे. तो अजूनही सिंगल आहे आणि लग्नाकरता मुली शोधत आहे. तेव्हा शाहरूख खानची नजर अनुष्कावर पडते. तिला पाहताच शाहरूख तिच्या प्रेमात पडतो.