VIDEO: जबरदस्ती किस! शाहरूख खान अडकला महिलांच्या घोळक्यात...

Shah Rukh Khan: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे शाहरूखची. त्याच्या 'जवान' या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्यात आता शाहरूख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. 

Updated: Sep 20, 2023, 06:22 PM IST
VIDEO: जबरदस्ती किस! शाहरूख खान अडकला महिलांच्या घोळक्यात...  title=
shah rukh khan kissed by female fans video goes viral on reddit

Shah Rukh Khan Molested by Ladies:सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानची. त्याचा जवान हा चित्रपट आता 1000 कोटींच्या घरात घौडदौड करतो आहे. त्यामुळे या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्याच्या अशाच एका व्हायरल व्हिडीओची. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की शाहरूख खान हा महिलांच्या घोळक्यामध्ये दिसतो आहे. त्याला या महिला जबरदस्ती कीस करताना दिसत आहेत. आपल्या समोर आपला आवडता कलाकार आला की त्याच्यासोबत सेल्फी घेणं किंवा त्याला मिठी मारणं, हात मिळवणं अशा गोष्टी होताना दिसतातच. पुर्वी ऑटोग्राफ घ्यायची आणि आपल्या आवडत्या कलाकाराशी बोलायची संधी मिळणं ही फार मोठी गोष्ट होती. परंतु आता सेल्फी घेणं, समोरच्याला न विचारताच मिठी मारणं, किस करणं असं अनेक काही उत्साही फॅन्सकडून घडताना दिसत आहे. त्यामुळे अशावेळी या अतिउत्साही फॅन्सची कायमच चर्चा रंगलेली असते.

असाच काहीचा प्रकार शाहरूख खानसोबतही घडला आहे. reddit वर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे ज्यात चारही बाजूंनी महिला दिसत आहेत ज्या त्याला गराडा घालून आहेत आणि शाहरूख दिसताच त्या प्रत्येक जणी नॉन स्टॉप किस करताना दिसत आहेत. त्यातून यावेळी आपल्यासोबत असं होत असतानाही शाहरूख खान मात्र फारच संयम ठेवून होता आणि त्यानं आपलं हास्यही कायम ठेवले होते. त्यामुळे त्याच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा रंगताना दिसत आहे. यावेळी अनेकांनी त्याला ट्रोलही केलं आहे परंतु त्यानं जो काही संयम दाखवला यावर मात्र त्याचे चाहतेही त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. 

हेही वाचा : सुधा मूर्तींनी सांगितलं; एक यशस्वी स्त्री होण्यासाठी काय हवं, ‘त्याशिवाय शक्यच नाही!’

नक्की काय घडलं?

सध्या शाहरूख खान हा एका इव्हेंटच्या बाहेर दिसत आहे. त्यात त्याच्या आजूबाजूला महिलांचा गर्दी पाहायला मिळते आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. या महिला त्याला हात लावत आहेत. काही सेल्फी घेत आहेत. तर काही तर त्याला कीसही करत आहेत. परंतु एकप्रकारे त्याच्यावर या महिला अत्याचार करत आहेत असेही अनेक जणं म्हणायला लागेल होते. त्यातून अनेकांनी या व्हिडीओवर नाराजीही व्यक्त केली आहे. 

SRK molested by ladies
byu/DreamBeliveActAchive inBollyBlindsNGossip

तीन महिन्यांपुर्वीही शाहरूख खानचा असाच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यात अशाच एका महिला फॅननं शाहरूखला कीस केलं होतं ज्यातही शाहरूखनं संयम दाखवला होता आणि त्याच्या या फॅनला ट्रोल करण्यात आले होते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x