शबाना आझमी अमिताभला म्हणाल्या, 'डोकं खाजवा आणि गप्पा झोडा'!

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचं एक साधं ट्विट सध्या चर्चेत आहे... त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यावर केलेली कमेंट... 

Updated: Sep 2, 2017, 08:20 PM IST
शबाना आझमी अमिताभला म्हणाल्या, 'डोकं खाजवा आणि गप्पा झोडा'! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचं एक साधं ट्विट सध्या चर्चेत आहे... त्याचं कारण म्हणजे अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यावर केलेली कमेंट... 

या दोघा दिग्गजांनी परवरिश आणि अमर अकबर अॅन्थनी यांसारख्या सिनेमांत एकत्र काम केलंय. 

'अचानक काम वेळेपूर्वीच संपलं तरी मोठी समस्या निर्माण होते... की आता काय करायचं? ट्विटर आणि एफबीजी जिंदाबाद' असं ट्विट अमिताभ यांनी केलं. 

त्यावर शबाना आझमी यांनी 'कामात व्यस्त राहणाऱ्यांनो! काही करू नका... फक्त डोकं खाजवा आणि गप्पा झोडा' अशी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. अर्थात गंमतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.  

शबाना ट्वीट्स