Sunny Leone सह पतीवरही गंभीर आरोप; अभिनेत्रीने ठोठावला न्यायालयाचा दरवाजा

सनीला न्यायालयात धाव का घ्यावी लागतेय, वाचा संपूर्ण प्रकरण   

Updated: Nov 16, 2022, 09:09 AM IST
Sunny Leone सह पतीवरही गंभीर आरोप; अभिनेत्रीने ठोठावला न्यायालयाचा दरवाजा title=

Sunny Leone Latest News : कायम आपल्या हॉट आणि बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लोयोनी (Sunny Leone) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. स्वतःवर दाखल केलेल्या आरोपांना रद्द करण्यासाठी अभिनेत्रीने (sunny leone latest news) न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. यासाठी अभिनेत्रीने केरळ उच्च न्यायालयात (Kerala High Court) धाव घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार वर्षांपूर्वी सनीविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. पण हे आरोप अभिनेत्रीने फेटाळून लावले आहेत. 

सनीवर लावण्यात आलेले आरोप
कोझिकोडमध्ये स्टेज परफॉर्मन्ससाठी सनीला बोलावण्यात आलं होतं, पण तिने झालेला करार पूर्ण न केल्याचा आरोप अभिनेत्रीसह पती डेनियल वेबर करण्यात आले आहेत. पण सनीने सर्व आरोप फेटाळत एफआयआर रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. (sunny leone latest interview)

अभिनेत्रीने फेटाळले आरोप
सनीने तिच्या याचिकेत स्वत:वर, पती डॅनियल वेबर (sunny leone husband) आणि कर्मचाऱ्यावर लावलेले आरोप फेटाळले आहेत. आपण कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नसल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. शिवाय आमच्या विरोधात कोणत्याही प्रकारचे पुरावे मिळाले नसल्याचं देखील सनीने सांगितलं आहे. याप्रकरणी सनीचा पती आणि कर्मचारी सुनील रजनी या प्रकरणातील दुसरे आणि तिसरे आरोपी आहेत. 

याप्रकरणी चौकशी सुरु
रिपोर्टनुसार, शिया कुन्हुमोहम्मद नावाच्या व्यक्ती सनी आणि पती डॅनियल वेबर आणि कर्मचाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरुन चौकशी सुरु आहे. शिया यांच्या तक्रारीनुसार, 'सनीने स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी 39 लाख रुपये घेतले. पण सनी लिओन आणि इतरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली नाही आणि रक्कमही परत केली नाही.' (sunny leone husband family)

या प्रकरणी सनी लिओनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. याशिवाय अभिनेत्रीचा पती डॅनियल वेबर आणि सनीच्या कंपनीतील कर्मचारी सुनील रजनी हे या प्रकरणात दुसरे आणि तिसरे आरोपी आहेत. एफआयआर रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.