ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या पुरस्काराने सन्मानित

 मुंबईत विलेपार्ले इथल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा संपन्न झाला. 

Updated: Dec 17, 2017, 08:35 AM IST
 ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या पुरस्काराने सन्मानित title=

मुंबई :  ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार तर अभिनेत्री अमृता सुभाषला स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्काराने गौरवण्यात आलं. 

पार्ल्यात सोहळा 

प्रसिद्ध संगीतकार आनंदजी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत विलेपार्ले इथल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा संपन्न झाला. 

आठवणींना उजाळा 

यावेळी रेखा यांनी स्मिता पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.