सेलेना गोमेज कधीच होऊ शकणार नाही आई! 32 वर्षांच्या गायिकेनं कारण सांगत व्यक्त केल्या भावना

Selena Gomez on Kids : सेलेना गोमेझनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 10, 2024, 06:03 PM IST
सेलेना गोमेज कधीच होऊ शकणार नाही आई! 32 वर्षांच्या गायिकेनं कारण सांगत व्यक्त केल्या भावना title=
(Photo Credit : Social Media)

Selena Gomez on Kids : लोकप्रिय अमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माती आणि बिझनेसवुमेन सेलेना गोमज ही नेहमीच तिच्या चर्चेत आहेत. त्यातही तिच्या कामापेक्षा तिचं खासगी आयुष्य हे जास्त चर्चेत असतं. सेलेना ही नेहमीच मोकळ्या मनानं बोलताना दिसते. सेलेनानं आता सांगितलं की ती कधीच आई होऊ शकणार नाही. त्यामुळे ती सरोगसीच्या मदतीनं बाळाला जन्म देणार. सेलेनानं हे देखील सांगितलं की मात्र, याचं काय कारण आहे, ज्यामुळे ती बाळाला जन्म देऊ शकत नाही.  

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, सेलेना गोमेजनं नुकतीच व्हॅनिटी फेयरला एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत तिनं खुलासा केला की ती स्वत: बाळाला जन्म देऊ शकत नाही. तिनं सांगितलं की कशाप्रकारे ती या मोठ्या धक्क्यातून ती कशी स्वत: ला सावरते. अनेक दिवस ती यात अडकून होती. 32 वर्षांच्या सेलेना गोमेजनं या मुलाखतीत सांगितलं की 'असं काही मी आधी कधीच बोलले नाही, पण दुर्दैवाने मी माझ्या स्वतःच्या बाळाला कधीच जन्म देऊ शकत नाही. मला अनेक आजार आहेत, ज्यामुळे माझे आणि बाळाचे जीवन धोक्यात येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे, ज्याला मान्य करायला मला खूप वेळ लागला.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सेलेना बराच काळापासून 'ल्यूपस' नावाच्या आजाराला झुंज देत होती आणि याविषयी तिनं स्पष्टपणे सांगितलं आहे. सेलेनाला ऑटोइम्यून हा आजार आहे. ज्यामुळे शरिरातील इम्यूनिटी सिस्टम स्वत: च्याच टिश्यूजवर हल्ला करतात. 

दरम्यान, 2017 मध्ये 'ल्यूपस' च्या कॉम्प्लिकेशनचं कारण सेलेनाच्या किडनी ट्रान्सल्पांट झालं. त्यांनी मेंटल प्रॉबल्म बायपोलर डिसऑर्डरविषयी देखील तिनं खुलासा केला होता. तिच्या डॉक्युमेंट्री 'माय माइंड अॅन्ड मी'मध्ये या विषयी दाखवण्यात आलं आहे. 

हेही वाचा : बहिणीच्या हळदीसमारंभात साई पल्लवीची धूम! पाहा VIDEO

सेलेना गोमेजची आई Mandy Teefey ला देखील दत्तक घेण्यात आलं होतं. तिनं सांगितलं होतं की मी आभारी आहे की मला असे लोक मिळाले. जे सरोगसी आणि दत्तक घेण्यासाठी तयार आहेत. माझे विचार वेगळे असले तरी शेवटी ते माझं मुलं असेल.