अमिताभ बच्चन यांचा 'तो' एक नकार अन् अनिल कपूरची चांदी; आजही बिग बींना होतोय पश्चाताप

Anil Kapoor 1990 Blockbuster Film: बॉलिवूडमध्ये असं अनेकदा होतं की, एखाद्या मोठ्या अभिनेत्याने नाकारलेला चित्रपट दुसऱ्या अभिनेत्याचं नशीब उजळवतो. अनिल कपूरसोबतही एकदा असंच झालं होतं. अनिल कपूरने अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, जे आधी दुसऱ्या अभिनेत्यांना ऑफर करण्यात आले होते. पण या भूमिका केल्याने अनिल कपूरला रातोरात प्रसिद्धी मिळाली. अशाच काही चित्रपटांबद्दल जाणून घ्या, ज्यासाठी अमिताभ बच्चन पहिली निवड होते. पण त्यांनी नकार दिल्यानंतर या भूमिका अनिल कपूरच्या पारड्यात पडल्या आणि त्यांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.   

शिवराज यादव | Updated: Sep 10, 2024, 05:30 PM IST
अमिताभ बच्चन यांचा 'तो' एक नकार अन् अनिल कपूरची चांदी; आजही बिग बींना होतोय पश्चाताप  title=

Anil Kapoor 1990 Blockbuster Film: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना इंडस्ट्रीत 55 वर्षं पूर्ण झाली आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अमिताभ बच्चन यांच्या नावावर अनेक सुपरहिट चित्रपट आहेत. आपल्या इतक्या यशस्वी करिअरमध्ये अमिताभ बच्चन यांनी काही चुका केल्या नाहीत असं नाही. त्यांनी काही चित्रपटांना नकारही दिला, जे पुढे जाऊन बॉक्स ऑफिसवर फार यशस्वी ठरले. आज अशा काही चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात ज्यासाठी सर्वात आधी अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. पण नंतर या भूमिका अनिल कपूरच्या वाट्याला गेल्या. 

अनिल कपूरसाठी 1990 वर्षं फारच लकी ठरलं होतं. या वर्षात त्याचे दोन चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांच्या यादीत होते. पण याचं श्रेय कुठे ना कुठे अमिताभ बच्चन यांचंही आहे. अनिल कपूर गेल्या 45 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत असून, त्याने 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 1990 च्या दशकात अनिल कपूरने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती. त्याचे दोन चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांच्या यादीत होते. विशेष म्हणजे यामध्ये अमिताभ बच्चन यांचा मोलाचा वाटा होता. 

1990 मध्ये अमिताभ बच्चन आपल्या 'आज का अर्जून' चित्रपटामुळे मोठ्या पडद्यावर गाजत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी अनिल कपूरचा चित्रपट 'किशन कन्हैय्या' त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला होता. निर्मात्यांनी या चित्रपटासाठी सर्वात आधी अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क साधला होता, पण त्यांनी नकार दिला होता. यानंतर ही चित्रपट अनिल कपूरच्या हाती लागला. 

जर अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट केला असता तर त्यावेळी चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही त्यांच्या नावावर असता आणि ते पुन्हा एकदा निर्विवाद बादशाह ठरले असते. पण अमिताभ बच्चन यांच्या नकारामुळे अनिल कपूरला मोठा फायदा झाला. अनिल कपूरच्या दोन चित्रपटांनी सर्वाधिक कमाई केली होती. यामधील एक 'किशन कन्हैय्या' चित्रपट होता. फार कमी बजेटमध्ये हा चित्रपट तयार करण्यात आला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने तुफान कमाई केली होती. 

अनिल कपूरचा चित्रपट 'किशन कन्हैय्या' पाचव्या, तर दुसरा चित्रपट 'घर हो तो ऐसा' 9 व्या क्रमांकावर होता. हा चित्रपटही सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांमध्ये होता. यामुळे अनिक कपूरचा डबल फायदा झाला होता. यासह त्याने तेव्हाचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना कडवी झुंज दिली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाचं बजेटही कमी होतं. या चित्रपटानेही दमदार कमाई केली होती.