टायगर श्रॉफसमोर मुलींची का लागलीय रांग? ऐकून तुम्हाला बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे

Updated: Apr 10, 2022, 09:51 PM IST
टायगर श्रॉफसमोर मुलींची का लागलीय रांग? ऐकून तुम्हाला बसेल धक्का title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ त्याच्या दमदार अभिनयासाठी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तर त्याचबरोबर एक्शन हिरो म्हटला जाणारा टायगर आपल्या मस्क्युलर बॉडीने लाखो लोकांना वेड लावतो. नुकताच टायगर श्रॉफचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्याची शर्टलेस स्टाईल पाहायला मिळत आहे. आणि तो परदेशी मुलींमध्ये उभा दिसतोय. या मुली टायगरच्या चाहत्या आहेत जे त्यांच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी त्याच्या सेटवर पोहोचल्या होत्या. टायगर श्रॉफला शर्टलेस पाहिल्यावर या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट होती. 

अशा परिस्थितीत आपल्या चाहत्यांना नाराज न करता टायगरने त्यांच्यासोबत शर्टलेस स्टाईलमध्ये फोटो क्लिक केला. या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ त्याच्या मस्क्युलर बॉडीला फ्लॉंट करताना दिसत आहे. टायगर श्रॉफची फॅन फॉलोइंग पाहिल्यानंतर तो देशातच नाही तर परदेशातही खूप लोकप्रिय असल्याचं दिसून येतं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

टायगर श्रॉफ शूटिंग केल्यानंतर थकला
टायगरला शर्टलेस पाहून परदेशी ब्युटीजनाही त्याचं वेड लागल्याचं दिसत आहे. त्यानंतर टायगरने त्यांना फोटो क्लिक करण्याची संधीही दिली. शूटिंगला कंटाळलेला टायगर व्हॅनिटी व्हॅनमध्ये न जाता चाहत्यांशी संवाद साधताना दिसला. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, टायगर श्रॉफ शूटिंगनंतर खूप थकला होता. मात्र टायगरचा स्वभाव असा आहे की, तो स्वतःमुळे इतरांना निराश होताना कधीही पाहू शकत नाही. टायगर श्रॉफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर टायगर श्रॉफ लवकरच हिरोपंती 2, गणपत आणि बडे मियाँ छोटे मियाँमध्ये दिसणार आहे.