मुंबई : अंकिता लोखंडे ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिच्याशी संबंधित कोणतीही बातमी सोशल मीडियावर व्हायरल व्हायला 2 मिनिटेही लागत नाहीत. अशा परिस्थितीत अंकिता लोखंडेने नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिने आजचा दिवस तिच्यासाठी खूप खास असल्याचं सांगितलं आहे. पती विकी जैनसोबतचा फोटो शेअर करत अंकिता लोखंडेने त्याच्यासाठी एक प्रेमळ संदेश लिहिला आहे. आणि 4 वर्षांपूर्वी तो तिच्या आयुष्यात आला आणि तिचं आयुष्य कसं बदललं हे सांगितलं आहे.
अंकिता लोखंडेने विकी जैनसोबत एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये विकी आणि अंकिता एकमेकांच्या डोळ्यांत मग्न झाल्याचं दिसत आहेत. अंकिता लोखंडेने निळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. तर दुसरीकडे, विकी जैन काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
हा फोटो शेअर करत अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ''हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे, तो दिवस ज्याने माझं आयुष्य आनंदाने भरलं आणि तुला माझ्या आयुष्यात आणलं. तू एक काळजी घेणारा आणि प्रिय प्रियकर आहेस आणि आता तू एका चांगल्या पतीची भूमिका निभावत आहेस. आमच्या नात्याला 4 वर्षांच्या शुभेच्छा.... यासोबत अंकिता लोखंडेने एक नजर इमोजी देखील शेअर केला आहे जेणेकरुन त्यांच्या नात्याला नजर लागू नये.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नाला 4 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. दोघंही सोशल मीडियावर कपल गोल सेट करताना दिसतात. अंकिता तिचा पती विकी जैनसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असते. आणि जेव्हा ती आपले प्रेम उघडपणे व्यक्त करते तेव्हा विकी देखील आपल्या पत्नीला स्पेशल फिल करण्याची संधी सोडत नाही.