टायगर श्रॉफच्या 'बागी-2'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई

अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या बागी-2 या चित्रपटानं पहिल्याच दिवशी रेकॉर्ड केला आहे.

Updated: Apr 1, 2018, 09:30 PM IST
टायगर श्रॉफच्या 'बागी-2'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई title=

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या बागी-2 या चित्रपटानं पहिल्याच दिवशी रेकॉर्ड केला आहे. टायगर श्रॉफच्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी २५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. एवढ्या कमाईसह बागी-2नं पद्मावतलाही मागे टाकलं आहे. यंदाच्या वर्षात बागी-2 हा सर्वाधिक ओपनिंग मिळालेला चित्रपट ठरला आहे.

दुसऱ्या दिवशीही चांगली कमाई

ट्रेड ऍनालिस्ट रमेश बाला यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी २२ कोटी रुपये कमवले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत चित्रपटानं ४७ कोटी रुपयांचा बिजनेस केला आहे. या चित्रपटाविषयी समिक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर टायगर श्रॉफच्या अॅक्शन सीनचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

काय आहे चित्रपटाची स्टोरी

या चित्रपटात टायगर रणवीर प्रताप सिंग उर्फ रॉनीच्या भूमिकेमध्ये आहे. रॉनी या चित्रपटात कमांडो दाखवला आहे. तर नेहा(दिशा) रॉनीची कॉलेजमधली प्रेमिका आहे. नेहाचं लग्न दुसऱ्याबरोबर झाल्यावर ती रॉनीला ४ वर्षांनी भेटते. नेहा रॉनीला तिच्या किडनॅप झालेल्या मुलीला शोधण्यासाठी मदत मागते आणि चित्रपटामध्ये सगळी अॅक्शन सुरु होते.