पद्मावती सिनेमाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने पद्मावती सिनेमाच्या रिलीजवर रोक लावण्याची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने म्हटलं की, सेन्सॉर बोर्डाने अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. आम्ही सेंसर बोर्डाच्या अधिकार क्षेत्रात दखल नाही देऊ शकतं.

Updated: Nov 10, 2017, 03:41 PM IST
पद्मावती सिनेमाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा title=

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने पद्मावती सिनेमाच्या रिलीजवर रोक लावण्याची याचिका फेटाळली आहे. कोर्टाने म्हटलं की, सेन्सॉर बोर्डाने अद्याप सिनेमा पाहिलेला नाही. आम्ही सेंसर बोर्डाच्या अधिकार क्षेत्रात दखल नाही देऊ शकतं.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर या चित्रपटाच्या भविष्याचा निर्णय आता सेन्सॉर बोर्डाच्या कोर्टात गेला आहे. चित्रपटास राजस्थानच्या राजघराण्याने देखील विरोध केला आहे.

याचिकाकर्ता सिद्धराज सिंह चूडास्मा आणि इतर विरोधकांनी असा विरोध केला आहे की, सिनेमामध्ये अल्लाउद्दीन खिलजी आणि पद्मावतीचं चरित्र ज्याप्रकारे दाखवण्यात आलं आहे ज्यामध्ये राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अशात या समाजाच्या लोकांना हा सिनेमा आधी दाखवला जावा. यासाठी सुप्रीम कोर्टाने एक कमेटी बनवावी आणि त्यांच्यासमोर त्यांची स्क्रिनिंग करावी.