सरोज खान यांचं कास्टिंग काऊचविषयीचं वादग्रस्त वक्तव्य

 प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी कास्टिंग काऊचबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कास्टिंग काऊच हे सिनेसृष्टीला नवीन नाही. 

Updated: Apr 24, 2018, 07:00 PM IST

सांगली : प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी कास्टिंग काऊचबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कास्टिंग काऊच हे सिनेसृष्टीला नवीन नाही. सिनेसृष्टी मुलींवर केवळ बलात्कार करून सोडत नाही, तर त्यांना उदरनिर्वाहाचं साधनंही देत असते असं अजब वक्तव्य करत सरोज खान यांनी कास्टिंग काऊचचं समर्थन केलं आहे. सिनेसृष्टी आपली मायबाप आहे त्याविषयी काही बोलू नका अशी पुस्तीही खान यांनी जोडली आहे. एवढंच नव्हे तर सरकारी अधिकारीही मुली आणि महिलांचा लैंगिक छळ करत असतात, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, अशा विषयावर बोलताना संवेदनशीलता बाळगली पाहिजे असा सल्ला महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सरोज खान यांना दिला आहे.