नाना पाटेकरांच्या मुलाबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

मल्हार सोशल मीडियावरही फारसा अॅक्टीव्ह नाही. त्यामुळेच, मोजक्याच लोकांना मल्हारबद्दल माहिती आहे. 

Updated: Apr 24, 2018, 06:08 PM IST
नाना पाटेकरांच्या मुलाबद्दल या गोष्टी माहीत आहेत का? title=

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारा मराठमोळा अभिनेता नाना पाटेकर म्हणून तुम्ही नानांना ओळखत असालच... पण, नानांच्या मुलाला तुम्ही क्वचितच पाहिलेलं असेल... 'स्टार कीड' असूनही नानांचा मुलगा मात्र कधीच स्टार अॅटिट्युड दाखवताना दिसला नाही... किंबहुना तो लाईम लाईटपासून दूर राहणंच पसंत करतो... मल्हार पाटेकर असं त्याचं नाव... आणि महत्त्वाचं म्हणजे, मल्हारचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे त्याचे वडील नाना पाटेकर...

क्रांतिवीर या सिनेमातून नानांनी सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली होती... आणि पहिल्या झटक्यातच त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर नाना आर्मीमध्ये कार्यरत होते... आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवत मल्हारलाही अत्यंत साध्या पद्धतीनं आयुष्य जगायला आवडतं. मात्र, वडिलांप्रमाणे कॅमेरा - लाईटस हा मल्हारच्या आयुष्याचा भाग नाही. 

इतकंच नाही तर मल्हार सोशल मीडियावरही फारसा अॅक्टीव्ह नाही. त्यामुळेच, मोजक्याच लोकांना मल्हारबद्दल माहिती आहे. 

मल्हारला सर्वात जास्त काय आवडतं? तर त्याला आपल्या कुटुंबासोबत राहणं आणि एन्जॉय करणं सगळ्यात जास्त आवडतं. वडिलांशी त्याची अत्यंत जिव्हाळ्याची मैत्री आहे.