Sara Ali Khan चा महागड्या गाडीतून नाही, तर लोकल ट्रेनमधून प्रवास

  साराने 2018 मध्ये बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. त्यानंतर तिने कधीही मागे पाहिलं नाही. 'केदारनाथ' सिनेमातून अभिनेत्री अभिनयाला सुरूवात केली. सध्या साराचा ट्रेनमधून प्रवास करताना व्हिडीओ व्हायरल होत आहे.     

Updated: Dec 10, 2022, 08:50 AM IST
Sara Ali Khan चा महागड्या गाडीतून नाही, तर लोकल ट्रेनमधून प्रवास

Sara Ali Khan journey by local train : 'केदारनाथ' (kedarnath) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. आज साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पहिल्याच सिनेमात कमालीचं अभिनय करत साराने चाहत्यांच्या मनात एक वेगळ स्थान तयार केलं. (Sara Ali Khan journey by local train ) सारा फक्त सिनेमे आणि अभिनयामुळे चर्चेत नसते, तर तिचा स्वभाव देखील अनेकांना आवडतो. आता देखील साराने चाहत्यांचं मन जिंकलं आहे. (Sara Ali Khan new photo)

सध्या सोशल मीडियावर साराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये अभिनेत्री मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (sara ali khan in relationship)

व्हिडीओ पोस्ट करत साराने कॅप्शनमध्ये, 'नमस्ते दर्शको... आज आम्ही आमच्या बुद्धीचा वापर केला आणि वेळाचा सदुपयोग करण्यासाठी ट्रेनने प्रवास केला...' असं लिहिलं आहे. सध्या अभिनेत्रीच्या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंट आणि लाईक्सचा पाउस पडत आहे. (sara ali khan on what women want)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये सारा लोकल ट्रेनने प्रवास करताना दिसते. लोकलमध्ये साराच्या अवती-भोवती सर्वत्र गर्दी दिसत आहे. लोकलने प्रवास केल्यानंतर अभिनेत्री रिक्षातून देखील प्रवास करते. साराचा साधेपणा पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. (sara ali khan age)

प्रसिद्धी-संपत्ती असताना देखील सारा सामान्य आयुष्य जगताना दिसते. सारा कायम तिच्या प्रेमळ स्वभावामुळे चर्चेत असते. आता लोकल ट्रेनमध्ये प्रवास करून साराने चाहत्यांच्या मनात स्वतःची खास जागा तयार केली आहे. (sara ali khan twitter)

सारा अली खानचे सिनेमे

साराने 2018 मध्ये बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. त्यानंतर तिने कधीही मागे पाहिलं नाही. 'केदारनाथ' सिनेमातून अभिनेत्री अभिनयाला सुरूवात केली. तेव्हापासून चाहत्यांनी साराला डोक्यावर घेतलं. त्यानंतर सारा  ‘सिम्बा’, ‘कुली नंबर 1’, ‘लव आज कल’, ‘अतरंगी रे’ या सिनेमांमध्ये दिसली. (sara ali khan movies)

आता सारा ‘मेट्रो इन दिनों’, ‘नखरेवाली’, ‘लुका छुप्पी’, ‘गॅसलाइट’ आणि ‘द इमोर्टल अश्वथामा’ या सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सारा आगामी सिनेमांच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.