एकेकाळी 96 किलो वजन असणाऱ्या सारा अली खानने सांगितला वजन कमी करण्याचा सोपा मार्ग

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या स्टाईलमुळे चर्चेत आहे

Updated: Jul 3, 2021, 09:42 PM IST
एकेकाळी 96 किलो वजन असणाऱ्या सारा अली खानने सांगितला वजन कमी करण्याचा सोपा मार्ग  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आज केवळ तिच्या चित्रपटांमुळे नव्हे तर तिच्या स्टाईलमुळे देखील चर्चेत आहे. संपूर्ण जगात आज साराचे चाहते आहेत. मात्र या टप्प्यावर पोहोचणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. स्टारकिड असूनही साराला इंडस्ट्रीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागली. खास करून तिने त्याच्या लूकवर खूप मेहनत घेतली आहे.

ऐकेकाळी साराचं 96 किलो वजन होतं
आज खूप सुंदर आणि स्लिम-ट्रिम दिसणारी साराचं वजन एकेकाळी खूप होतं. चित्रपटात पाऊल ठेवण्यापूर्वीच साराने स्वत:ला तंदुरुस्त केलं. बातमीनुसार, यापूर्वी साराचे वजन 96 किलो होतं. अशा परिस्थितीत साराचं वजन इतकं कसं कमी झालं हे जाणून घेण्यासाठी तिचे सर्व चाहते नेहमी उत्साही असतात. कारण वजन कमी करणं कदाचित या जगातील सर्वात कठीण गोष्टींपैकी एक मानली जाते.

'केदारनाथ'मध्ये साराला पाहून प्रेक्षक झाले आश्चर्यचकित 
सारा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ती बर्‍याचदा तिच्या व्हिडिओंमध्ये वर्कआऊट करताना दिसते. आता पुन्हा साराचा एक वर्कआउट व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. याद्वारे तिने स्वत:ला फिट कसं ठेवते हे सांगितले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यूजर्स आता या व्हिडिओवर बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यापूर्वी साराचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्यात ती जाड दिसत होती. मात्र, जेव्हा तिने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं तेव्हा तिचा स्लिमट्रिम लूक पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

साराचं वर्कफ्रंट
साराच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती वरुण धवनसोबत 'कुली नंबर 1' चित्रपटात दिसली होती. गेल्या काही काळापासून ती 'अतरंगी रे'च्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि अभिनेता धनुष सोबत दिसणार आहे.