सई ताम्हणकरने उडवली स्वत:ची खिल्ली, पा़हा सईचा व्हायरल व्हिडीओ

मराठी इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर

Updated: Jul 3, 2021, 08:57 PM IST
सई ताम्हणकरने उडवली स्वत:ची खिल्ली, पा़हा सईचा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : मराठी इंडस्ट्रीमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. दिलखुलास, मोकळा स्वभाव आणि अभिनयाची जाण यामुळे सईने मराठी प्रेक्षकांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. सईचं सोशल मीडियावरही प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. सईने सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ टाकला की, तो लगेच व्हायरल होतोच. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ स्वत: सईने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

आवरणार नाही हसू
सईने शेअर केलेला हा व्हिडिओ 'दुनियादारी' सिनेमा मधल्या शेवटच्या सीनवर आधारित आहे. हा व्हिडीओ तिच्या एका चाहत्याने एडिट केला आहे. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते पोटभर हसतील हे नक्की. या कॉमेडी व्हिडिओमध्ये स्वप्निल जोशीच्या जागी तिचा चाहता दिसत आहे. सईने दिलेलं या व्हिडिओचं कॅप्शन चाहत्यांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. इस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओवर सईने ''टिक टिक वाजते डोक्यात, खाऊ खाऊ वाटते पोटात'' अशा आशयाचं कॅप्शन दिलं आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सई ताम्हणकरने 2008 मध्ये 'सनई चौघडे' सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिचा पहिलाच सिनेमा लोकप्रिय झाला. त्यानंतर सांगलीच्या या कधी मागे वळून पाहिलंच नाही. 'पिकनिक', 'गजनी', 'लालबाग परळ', 'मिशन पॉसिबल' 'दुनियादारी' 'क्लासमेट' असे अनेक चित्रपट दिलं आहेत. 'नो एण्ट्री' या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. या चित्रपटात तिने घातलेल्या बिकनीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सई लवकरच 'समांतर 2' या सिनेमात डबल रोल मध्ये दिसणार आहे.