'संजू' सिनेमाचे आणखी एक पोस्टर रिलीज

Updated: May 13, 2018, 08:04 AM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा मच अवेटेड सिनेमा 'संजू' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाबाबत रणबीर कपूर आणि संजय दत्त असे दोघांचे फॅन्स एक्सायटेड आहेत. आज या सिनेमाच्या टीझरची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर आता सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आलयं. या पोस्टरमध्ये रणबीरने सफेद रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातलाय.  राजकुमार हिरानी या सिनेमाला दिग्दर्शित करत असून त्यांनी आपल्या ट्विटरवरून सिनेमाचे पोस्टर रिलीज केलंय. सिनेमाच्या शुटिंग दरम्यानचे रणबीर कपूरचे काही फोटो व्हायरल झाले होते. आणि आता या टीझरनंतर प्रेक्षकांची उत्सुकता अधिक वाढली आहे.

२९ जूनला रिलीज

या सिनेमामुळे संजय दत्त आणि रणबीर कपूरचे फॅन्स एक्साइटेड आहेत. रणबीर कपूरने तरूण संजय दत्त आणि मधल्या काळातला संजय दत्त अगदी उत्कृष्ठपणे साकारला आहे. हा सिनेमा २९ जून रोजी रिलीज होत आहे. विदू विनोद चोपडा आणि राजकुमार हिरानी यांच्या प्रोडक्शन बॅनर खाली हा सिनेमा तयार होत आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी राजकुमार हिरानी यांच्याकडे आहे. हा टीझर एकाचवेळी 80 हून अधिक चॅनल्सवर रिलीज करण्यात आला होता.

संजय दत्तने केला रणबीरचा अपमान 

2016 च्या शेवटच्या दिवसांमध्ये संजय दत्तच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरला कास्ट करण्यात आलं होतं. तेव्हा संजय दत्तने रणबीर कपूरला एका पार्टीत खूप अपमान केला होता. या पार्टीची आणि अपमानाची भरपूर चर्चा रंगली होती. डीएनएने दिलेल्या माहितीनुसार, त्या पार्टीत संजय दत्तने रणबीरला सगळ्यांसमोर विचारलं की, मला कळत नाही की, तुला या सिनेमासाठी का कास्ट केलं? या पार्टीत राजकुमार हिरानी, डेविड धवन आणि अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. यानंतर रणबीर कपूरने या सिनेमांसाठी काम केलं असून स्वतःला अगदी त्याच साज्यात बसवलं आहे. 

..म्हणून राजकुमार हिरानीने केली रणबीरची निवड 

राजकुमार हिरानीने डीएनएसोबत बोलताना या सिनेमाबाबतच्या अनेक गोष्टी खुल्या केल्या. यावेळी त्यांनी संजय दत्तच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरचीच का निवड केली याबाबत देखील सांगितलं. हिरानी यांनी या सिनेमासाठी रणबीरला मॅसेज केला होता. त्यांनी सांगितलं की, माझ्या कडे एक स्क्रिप्ट आहे याबाबत आपण एकदा भेटून बोलू. तेव्हा स्वतः रणबीर कपूर त्यांना म्हणाला की, मला आशा आहे की, हा सिनेमा संजय दत्तचा बायोपिक नसेल. तेव्हा त्यांनी मॅसेज केला की, हा तोच सिनेमा आहे पण मला तुझ्याशी भेटून बोलायचं आहे. 
 
हिरानी यांनी पुढे सांगितलं की, रणबीरने जेव्हा या स्क्रिप्टचे वाचन केलं तेव्हा खूप प्रभावित झाला. आणि मग तो लगेच या सिनेमांत संजय दत्तची भूमिका साकारायला तयार झाला. हिरानी यांनी हे देखील सांगितलं की, रणबीरने संजय दत्त यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. जसं की संजय दत्त यांच्या कॉन्ट्रीवर्सीज त्यामुळे तो या सिनेमाचा भाग होत नव्हता. मात्र स्क्रिप्ट ऐकल्यावर तो तयार झाला. त्यानंतर हिरानी यांनी पुढे सांगितलं की, रणबीरला त्याच्या वयामुळे देखील सिलेक्ट केलं. कारण मला असा अभिनेता हवा होता जो स्वतःला 21 ते 56 च्या वयात स्वतःला बघू शकेल. आणि मग हा सिनेमा शूट झाला. आणि तो जूनमध्ये प्रदर्शित होत आहे.