संजय दत्तचा पत्नीसोबत बेडरुममधील प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल

बॉलीवूडचा बाबा संजय दत्त त्याच्या रफ अँड टफ स्टाइलसाठी ओळखला जातो.

Updated: Feb 11, 2022, 08:55 PM IST
संजय दत्तचा पत्नीसोबत बेडरुममधील प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : बॉलीवूडचा बाबा संजय दत्त त्याच्या रफ अँड टफ स्टाइलसाठी ओळखला जातो. पण बायकोसमोर येताच तो विरघळून जातो. अलीकडेच मान्यताने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो पत्नीचे पाय दाबताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मान्यताने शेअर केला व्हिडिओ
संजय दत्त आणि मान्यता दत्तच्या लग्नाला 14 वर्षे झाली आहेत. संजय दत्त आणि मान्यता दत्त आज लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. दोघंही सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात. मात्र आज या खास प्रसंगी मान्यताने संजयचा एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो तिचे पाय दाबत आहे. अभिनेत्याची ही स्टाईल चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

पत्नीचे पाय दबाताना दिसला संजय दत्त
या व्हिडिओमध्ये संजय दत्त पत्नी मान्यताचे पाय दाबताना दिसत आहे. तेही खूप प्रेमाने. मान्यताने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'मी माझे चांगले दिवस तुझ्यासोबत घालवले आहेत. तू जसा आहेस त्यावर मी तुझ्यावर प्रेम करते. 'Happy Anniversary' मान्यताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.