संजय दत्तनं का झाडली मोलकरणीवर गोळी

संजय दत्तनं नुकताच त्याचा 63 वा वाढदिवस साजरा केला. 

Updated: Jul 30, 2022, 03:58 PM IST
संजय दत्तनं का झाडली मोलकरणीवर गोळी title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा काल 29 जुलै रोजी 63 वा वाढदिवस साजरा केला. एकामागून एक हिट चित्रपट देणाऱ्या यशस्वी अभिनेत्यांमध्ये संजय दत्तची गणना होते. संजय दत्तचा चित्रपटांमधील सुरुवातीचा प्रवास काही फारसा चांगला नव्हता, पण मेहनतीनं त्याने ते स्थान मिळवले की त्याला फिल्मफेअर पुरस्कार ते ग्लोबल इंडियन फिल्म अवॉर्ड मिळाले.संजय दत्तने वयाच्या 22 व्या वर्षी 'रॉकी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. संजयचे आयुष्य सोपे नव्हते, त्याने जितके नाव कमावले, तितक्याच त्याच्या आयुष्यात अडचणी आल्या. संजय दत्त कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे. 

मोलकरणीला लागली होती गोळी 

संजय दत्तला लहानपणापासूनच टॉय गनची खूप आवड होती. दत्त कुटुंबातील एका जवळच्या मित्राने सांगितले होते की, लहानपणी एकदा संजयच्या हाती त्याच्या वडिलांची लायसन्स बंदुक लागली होती.  त्यामुळे खेळताना चुकून त्याने आपल्याच मोलकरणीवर गोळी झाडली आणि ती गंभीर जखमी झाली. यानंतर संजयच्या कुटुंबीयांनी त्या मोलकर्णीवर उपचार केले आणि संपूर्ण प्रकरण तिथेच थांबले. 

ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे संजय 2 दिवस झोपला होता

 एक काळ असा होता जेव्हा संजय दत्तला ड्रग्जचे व्यसन लागले होते. एका मीडिया रिपोर्टनुसार, एका मुलाखतीदरम्यान संजयने खुलासा केला होता की, त्याला लहान वयातच ड्रग्जचे व्यसन लागले होते. एकदा तर ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे तो 2 दिवस झोपून होता आणि त्याला या परिस्थितीबद्दल काहीच भान राहिले नाही.

2 दिवसांनी जेव्हा संजयला जाग आली तेव्हा त्याच्या घरात काम करणारा नोकर त्याला पाहून रडू लागला, संजय बाबा तुम्ही 2 दिवसांनी उठलात. हे सर्व ऐकून संजयला खूप आश्‍चर्य वाटले आणि त्याला समजले की जर त्याने त्याची ड्रग्सची सवय सोडली नाही तर त्याचं काही खरं नाही. यानंतर संजयने या सर्व गोष्टी वडील सुनील दत्त यांच्याशी शेअर केल्या आणि त्याला स्वतःची ही सवय सोडवण्यास सांगितले, नंतर त्याच्या वडिलांनी त्याला अमेरिकेतील प्रसिद्ध व्यसनमुक्ती केंद्रात पाठवले.

संजय दत्तच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी संजय 'शमशेरा' चित्रपटात दिसला होता. याशिवाय तो लवकरच 'द गुड महाराजा' या चित्रपटात दिसणार आहे जो यावर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.