...ड्रग्जच्या नशेत बुडालेला संजय दत्त दोन दिवसांनंतर उठला!

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणारआहे. या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत म्हणजेच संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Updated: Jul 12, 2017, 05:12 PM IST
...ड्रग्जच्या नशेत बुडालेला संजय दत्त दोन दिवसांनंतर उठला! title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणारआहे. या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत म्हणजेच संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. 

संजय दत्तला ड्रग्जची सवय कशी लागली... आणि ही सवय त्याच्या आयुष्यावर कशी भारी पडली... हेदेखील या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

ड्रग्ज घेतल्यामुळे संजयची प्रकृती खूपच बिघडली होती... याचा सर्वात जास्त त्रास त्याच्या वडिलांना म्हणजे सुनील दत्त यांना सहन करावा लागला. त्यांनी संजयला उपचारासाठी अमेरिकेलादेखील पाठवलं होतं. सिनेमातल्या याच भागाचं शूटींग न्यूयॉर्कमधल्या एका रिहॅब सेंटरमध्ये होणार आहे. 

संजयच्या ड्रग्ज नादाचा एक किस्सा भलताच चर्चेत आहे... ड्रग्जच्या नशेत बुडालेला संजय एकदा घरी येऊन झोपला... जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा त्याच्या बाजुला उभा राहिलेला नोकर त्याची अवस्था पाहून रडत होता... त्याच्याशी बोलत असताना आपल्याला तब्बल दोन दिवसांनंतर शुद्ध आल्याचं संजयच्या लक्षात आलं. यावेळी भूकेनं तो व्याकूळ झाला होता.  

संजय दत्तच्या जीवनावर आधारित या सिनेमाचं नाव अजून ठरलेलं नाही... सिनेमा कधी प्रदर्शित होणार हेदेखील अजून निश्चित नाही.