Sanjay Dutt च्या लेकीच्या अंगावर 'त्या' जखमा कसल्या, सावत्र आई म्हणाली..

संजूबाबाच्या लेकीनं त्या जखमांबद्दल लिहिली भावुक पोस्ट, त्यातून तिने कसं सावरलं पाहा काय म्हणाली...  

Updated: Jul 19, 2022, 10:06 AM IST
Sanjay Dutt च्या लेकीच्या अंगावर 'त्या' जखमा कसल्या, सावत्र आई म्हणाली.. title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्त सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे तिच्या हटके अदा नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस पडतात. त्रिशाला मानसोपचारतज्ज्ञ असून ती अनेकदा लोकांना मानसिक आरोग्याबाबत जागरूक करताना दिसते. सोशल मीडियावर ती तिच्या बोल्ड फोटोंसाठी प्रसिद्ध आहे. नेहमी बोल्ड फोटो शेअर करणाऱ्या त्रिशालाने स्वतःच्या शरीरावर असलेल्या जखमांचा फोटो शेअर केला. शिवाय या जखमा तिच्या शरीरावर का झाल्या, याचं कारण देखील त्रिशालाने  सांगितलं आहे. 

त्रिशालाने तिच्या शरीरावर पडलेले स्ट्रेच मार्क्स दाखवत तिचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'शरीरावर असलेले स्ट्रेच मार्क्स तिला वजन कमी करण्याच्या प्रवासाची आठवण करून देतात. त्रिशालाने हे देखील सांगितलं की अनेक वर्ष तिच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स होते. पण आता ते कमी होत आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे त्रिशालाने निडरपणे शरीरावर स्ट्रेच मार्क्स असलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्रिशालाच्या पोस्टवर सावत्र आई आणि संजूबाबाची दुसरी पत्नी मान्यताने इमोजी पाठवत कमेंट केली आहे. 

त्रिशालाबद्द सांगायचं झालं तर. संजय दत्त आणि पहिली पत्नी रिचा शर्मा यांची मुलगी त्रिशाला दत्त अमेरिकेत राहते.  संजय दत्त आपल्या मुलीला भेटण्यासाठी अमेरिकेला जात असतो.