Salman Khan नेच ठरवली होती त्याची आणि Sangeeta Bijlani च्या लग्नाची तारिख, पण...

Sangeeta Bijlani's Birthday Special: संगीता बिजलानीचा आज वाढदिवस असून तिच्या वाढदिवसानिमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया... त्यात एक म्हणजे संगीता आणि सलमानच्या लग्नाची तारिख ठरली असताना अचनाक असं काय झालं की त्यांचं लग्न मोडलं हे जाणून घेऊया.

दिक्षा पाटील | Updated: Jul 9, 2023, 01:20 PM IST
Salman Khan नेच ठरवली होती त्याची आणि Sangeeta Bijlani च्या लग्नाची तारिख, पण... title=
(Photo Credit : Social Media)

Sangeeta Bijlani's Birthday Special: बॉलिवूड अभिनेत्री आणि सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड संगीता बिजलानीचा आज 9 जुलै रोजी वाढदिवस आहे. संगीता आज तिचा 63 वा वाढदिवस साजरा करते. संगीतानं मिस इंडिया झाल्यानंतर 1987 साली प्रदर्शित झालेल्या कातिल या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाविषयी जितकी चर्चा झाली नाही त्यापेक्षा जास्त चर्चा ही तिच्या आणि सलमान खानच्या नात्यामुळे झाली होती. संगीता आणि सलमान आज खूप चांगले मित्र असले तरी देखील कधी काळी ते रिलेशनशिपमध्ये होते. इतकंच नाही तर ते दोघं लग्न बंधनात अडकणार होते. पण अचानक त्या दोघांचं लग्न कॅन्सल झालं आणि त्याचं नातं देखील तिथेच संपलं. 

संगीता बिजलानीनं 1996 साली क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनशी विवाह केला. पण 2010 मध्ये दोघे विभक्त झाले. रिपोर्ट्सनुसार, ते दोघं विभक्त होण्याचं कारण मोहम्मद अजहरुद्दीनचं ज्वाला गुट्टासोबत असलेलं अफेअर असल्याचे म्हटले जाते. पण त्यानं यावर नकार दिला होता. मोहम्मद अजहरुद्दीनशी लग्न करण्याआधी संगीता बिजलानी सलमान खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. इतकंच नाही तर त्यांचं लग्न होणार होतं. पण काही कारणांमुळे त्याचं लग्न मोडलं. याविषयी जासिम खान यांच्या लिहिलेल्या 'बीइंग ह्यूमन' या पुस्तकात केला आहे. संगीता बिजलानीनं एका मुलाखतीत दावा केला होता की तिचं आणि सलमान खानचं लग्न देखील झालं होतं. सलमाननं स्वत: 27 मे 1994 ही तारिख निवडली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : दरवाजा न उघडता कारमध्ये बसण्याची Lisa Haydonनं सांगितली भन्नाट ट्रिक, VIDEO एकदा पाहाच

संगीता बिजलानीनं सांगितलं की तिच्यासोबत लग्न करण्यासाठी सलमानच्या कुटुंबानं त्याला परवानगी दिली होती. पण संगीताच्या कुटुंबाला थोडी धाक-धुकी होती. खरंतर त्यांची लेक आनंदी राहिल की नाही असा प्रश्न पडला होता. लग्नाच्या एक महिना आधी संगीताला काहीतरी गडबड असल्याचे वाटू लागले त्यामुळे तिनं सलमानचा पाढलाग करणं सुरु केलं. त्यानंतर तिला कळलं की सलमान त्यावेळी सोमी अलीला डेट करत होतो. रिपोर्ट्सनुसार, संगीतानं सलमानला चीट करताना पकडल्याचं म्हटलं जातं. याच कारणामुळे त्यांचं लग्न मोडलं असं म्हटलं जातं. जेव्हा संगीताला हे सगळं कळलं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला असं तिनं सांगितल्याचं म्हटलं जातं. इतकंच नाही तर सलमाननं हे मान्य केलं होतं की त्याच्या लग्नाच्या पत्रिका छापून झाल्या होत्या. त्यानंतर त्यानं धोका दिल्याचे कळले आणि त्यांचे नाते तुटले. पण यावेळी सलमाननं संगीताचं नाव घेतलं नाही. दरम्यान, संगीता बऱ्याचवेळा सलमानच्या बर्थे किंवा इतर काही कार्यक्रमांमध्ये दिसते.