'माझ्या मुलीनं उगीच कंबर का हलवावी?’ …म्हणून संजय दत्त मुलीला बॉलिवूडमध्ये येऊ देत नाही!

Sanjay Dutt on Daughter Trishala's entry in Bollywood : संजय दत्तनं एका मुलाखतीत त्रिशालाच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीवर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 19, 2024, 05:50 PM IST
'माझ्या मुलीनं उगीच कंबर का हलवावी?’ …म्हणून संजय दत्त मुलीला बॉलिवूडमध्ये येऊ देत नाही! title=
(Photo Credit : Social Media)

Sanjay Dutt on Daughter Trishala's entry in Bollywood : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची लाडकी मुलगी त्रिशाला दत्त ही कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. त्रिशाला दत्त ही न्यूयॉर्कमध्ये राहत असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सततचे अपडेट देत असते. यावेळी मात्र त्रिशाला तिच्या वडिलांच्या वक्तव्याने चर्चेत आली आहे. मुलीने आपल्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवुडमध्ये यावं असं अभिनेत संजय दत्तला मुळीच वाटत नव्हतं. त्रिशालाने आपला निर्णय मागे घेतला नाही म्हणून संजय दत्त नाराज देखील झाला होता. याविषयी बोलताना संजय दत्तने एकदा म्हटलं होतं की मला वाटायचं की त्रिशालाने अमेरिकीचे गुप्तचर यंत्रणा असलेल्या एफबीआयमध्ये सामील व्हावं.

संजय दत्तने लहानपणीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र या क्षेत्रापासून त्याने आपल्या मुलांना लांब ठेवलं आहे. अशातच संजय दत्तचा एक जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये संजय दत्त मोठी मुलगी त्रिशालाबद्दल बोलताना दिसत आहे. माझ्या मुलीने बॉलिवुडमध्ये येऊ नये असे मला वाटतं असे संजय दत्तने म्हटलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्रिशाला ही संजय दत्त आणि त्याची पहिली पत्नी ऋचा शर्माची मुलगी आहे. लहानपणापासूनच ती अमेरिकेत राहत आहे. चाहत्यांना तिने चित्रपटसृष्टीत यावं असे वाटतं मात्र संजय दत्तला हे अजिबात मान्य नाही. 2012 मध्ये फिल्मफेअर दरम्यानच्या मुलाखतीमध्ये संजय दत्तला त्याच्या मुलीबाबत विचारलं होतं. संजय दत्तने सांगितले की, "त्रिशालाच्या चित्रपटसृष्टीत येण्याच्या इच्छेने मी हैराण झालो होतो. मला आनंद आहे की तिच्या डोक्यावरचं अभिनयाचं भूत शेवटी उतरलं. तिने सध्यातरी चित्रपटांमध्ये काम करण्याची तिची इच्छा दाबून ठेवली आहे." 

"त्रिशाला खूप हुशार मुलगी असून तिने फॉरेन्सिक सायन्समध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यामुळे मला कधीच कळलं नाही की तिला हे सगळं सोडून अभिनयात करिअर का करायचं आहे? या क्षेत्रात काम करण्यासाठी इथल्या भाषेबद्दल माहिती असणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे तिला भाषेची मोठी अडचण येणार होती. देवालाच माहिती असेल तिच्या डोक्यात हा विचार कुठून आला. मला आशा आहे की ती लवकरच एफबीआयमध्ये सामील होईल आणि मला अभिमान वाटेल. तिच्या शिक्षणाचा काही उपयोग झाला पाहिजे", असंही संजय दत्त म्हणाला होता.

हेही वाचा : अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीचा अपघात, पतीकडून चाहत्यांना प्रार्थना करण्याची विनवणी

दुसरीकडे, 2012 मध्येच संजय दत्तने एक वादग्रस्त मुलाखत दिली होती आणि सांगितले होते की, "त्रिशाला एक फॉरेन्सिक सायंटिस्ट आहे आणि तिच्याकडे चांगली नोकरी आहे. तिने इथे येऊन कंबर हलवावी असे मला का वाटेल?" संजय दत्तच्या या वक्तव्यावरून त्यावेळीही खळबळ उडाली होती. मात्र आता पुन्हा एकदा या व्हायरल झालेल्या विधानाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.