आजारपणाशी झुंजणाऱ्या समंथाचा Ex Husband दुसरं लग्न करणार? त्याची होणारी पत्नी आहे एका धनाढ्य व्यावसायिकाची लेक

Naga Chaitanya Marriage: समंथाचा पूर्वाश्रमीचा पती, नागा चैतन्य आता त्याच्या खासगी आयुष्याला प्राधान्य देताना दिसत असून येत्या काळात तो लग्नही करु अशा चर्चांना उधाण.   

सायली पाटील | Updated: Sep 15, 2023, 09:12 AM IST
आजारपणाशी झुंजणाऱ्या समंथाचा Ex Husband दुसरं लग्न करणार? त्याची होणारी पत्नी आहे एका धनाढ्य व्यावसायिकाची लेक   title=
samantha ruth prabhus ex husband Naga Chaitanya Marriage rumors with shobhita dhulipala

Naga Chaitanya Marriage: मागील काही वर्षांमध्ये विविधभाषी कलाजगतं एकत्र येताना दिसत असल्यामुळं प्रेक्षकांनाही कलाकार नवे राहिलेले नाहीत. अशाच कमालीच्या लोकप्रिय असणाऱ्या दाक्षिणात्य कलाजगतातील एक नाव म्हणजे अभिनेता नागा चैतन्यचं. नागार्जुनचा मुलगा म्हणून त्याची ओळख. शिवाय अभिनेत्री समंथा रुथ प्रभूशी असणारं त्याचं रिलेशनशिप, त्यानंतर लग्न आणि चार वर्षांच्या संसारानंतर झालेला घटस्फोट हे सर्वकाही चाहत्यांनी पाहिलं. 

घटस्फोटानंतर समंथा आणि नागा चैतन्यच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि तिनं आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केलं. दरम्यानच्या काळात समंथाला एका दुर्धर आजारानं ग्रासलं ज्याच्याशी ती दोन हात करत मजलदरमजल गाठत आजारपणावर मात करताना दिसली. तिथं नागा चैतन्यही कारकिर्दीत पुढे आला. सोबतच त्यानं खासगी आयुष्यालाही केंद्रस्थानी ठेवल्याचं पाहायला मिळालं. 

पहिल्या लग्नानंतरच्या घटस्फोटातून समंथा अद्यापही सावरतानाच दिसत आहे. पण, नागा चैतन्य मात्र बराच पुढे आला असून, त्याचं नाव एका बोल्ड अंदाजाच्या अभिनेत्रीशी जोडलं गेलं. ही अभिनेत्री म्हणजे Made in heaven फेम शोभिका धुलिपाला. समंथाशी नातं तुटताच तिच्या Ex husband चं नाव शोभिताशी जोडण्यात आलं. शोभिताला बऱ्याचदा अभिनेत्याच्या घरीही पाहिलं गेलं. पण, या दोघांनीही त्यांच्या नात्याचा अधिकृत स्वीकार केलेला नाही.

लग्नाच्या तयारीत नागा चैतन्य? 

इथं हे नातं स्वीकृतीच्या प्रतीक्षेत असतानाच तिथं नागा चैतन्यच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये अभिनेता दुसरं लग्न करू शकतो. पण, त्याची होणारी पत्नी शोभिता असणार की आणखी कोण हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. कलाजगतातील चर्चांनुसार अभिनेते नागार्जुन लेकाच्या भावी आयुष्याच्या दृष्टीनं विचार करत असून, मुलाच्या दुसऱ्या लग्नासाठी गांभीर्यानं प्रयत्न करत आहे. इतकंच नव्हे तर, त्याची होणारी पत्नी म्हणून त्यांनी एका मोठ्या व्यावसायिकाची मुलगी निवडली असून तिचा कलाविश्वाशी थेट संबंध नसल्याचं म्हटलं जात आहे. 

हेसुद्धा वाचा : लडाखवरून परतताच राहुल गांधी यांनी शेअर केला नवा Video; आरोप नव्हे, पण सत्ताधाऱ्यांचं वास्तव समोर आणत म्हणाले... 

 

बरं, तिथं कोणा एका व्यावसायिकाच्या मुलीशी नागा चैतन्य लग्न करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं गेल्यामुळं शोभिता अन् त्याच्या नात्याविषयीच्या चर्चा काहीशा शमल्याचं चित्र आहे. आता सर्वांनाच त्याची होणारी पत्नी कोण? हाच प्रश्न पडतोय. तेव्हा आता याचं उत्तर केव्हा समोर येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.