सेकंड हँड, लुटारू आणि बरंच काही ऐकल्यानंतर समंथाच्या भावनांचा बांध फुटला

काय झालीये समंथाची अवस्था

Updated: Dec 24, 2021, 11:45 AM IST
सेकंड हँड, लुटारू आणि बरंच काही ऐकल्यानंतर समंथाच्या भावनांचा बांध फुटला  title=

मुंबई : अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या नात्यामध्ये तणाव आला आणि काही दिवसांनीच या दोघांनीही घटस्फोटाचं वृत्त जाहीर केलं. समंथा आणि नागा चैतन्यच्या नात्याला तडा गेला. या दोघांच्या वाटाही वेळ्या झाल्या. पण, समंथाची अवस्था मात्र चिंतेत टाकणाऱ्या वळणावर आली आहे. 

खासगी आयुष्यातील अत्यंत वादळी वळनानंतर तरी काहीशी शांतता असेल अशी अपेक्षा करत असतानाच समंथापुढे आणखीही काही आव्हानं उभी होती. 

समंथावर सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात येत आहे. कोणी तिला सेकंड हँड म्हणताना दिसतंय, तर कोणी तिच्यावर पतीकडून पैसे उकळल्याचा आरोप करत आहे. 

आपल्यावर होणारी ही सर्व टीका सहन केल्यानंतर आता समंथानं अखेर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

व्हिडीओमध्ये हॉलिवूड स्टार टॉम हँक अत्यंत महत्त्वाचा मेसेज देत आहेत. 

“this too shall pass"  म्हणजेच का काळही दूर होईल असं म्हणत आयुष्यात काही गोष्टी आपल्याला किती लवकर उमगल्या हे हँक सांगताना दिसत आहेत. 

'मला माहित असतं की हा काळसुद्धा निधून गेला असता. सध्या तुम्हाला वाईट वाटतंय, राग येतोय, चिडचीड होतेय पण जातील हे दिवस. 

तुम्हालाही भारावल्यासारखं वाटेल. सर्व प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत असं तुम्हाला जाणवेल....', असं म्हणत हँक इथं स्वत:वर संयम राखा असं म्हणताना दिसत आहेत. 

समंथानं हा व्हिडीओ शेअर करत “this too shall pass" अशी ओळ त्यावर लिहिली आहे. 

वैवाहिक नात्यात अपयशी ठरलेल्या समंथानं काही दिवसांपूर्वीच आपण येत्या नव्या वर्षातून फार काही अपेक्षा ठेवल्या नसल्याचं स्पष्ट केलं. 

समंथा आणि नागा चैतन्य यांनी ऑक्टोबर महिन्यात त्यांचा घटस्फोट जाहीर केला होता. त्यााधीपासूनच ही जोडी विभक्त राहत होती. 

चाहत्यांसाठी समंथा आणि नागा चैतन्यच्या नात्याला तडा जाणं ही धक्कादायक बाब ठरली होती.