'रेस 3' चित्रपटातील सलमानचा फर्स्ट लूक प्रदर्शित...

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानचा 'टाइगर जिंदा है' हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 13, 2017, 01:19 PM IST
 'रेस 3' चित्रपटातील सलमानचा फर्स्ट लूक प्रदर्शित... title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानचा 'टाइगर जिंदा है' हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर भलताच धुमाकूळ घातला. काही दिवसांपूर्वीच 'टाइगर जिंदा है' चे शूटिंग पूर्ण झाले. आता सध्या तो  'रेस 3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करताच त्याने चित्रपटातील आपला फर्स्ट लुक शेअर केला. 

चित्रपटाच्या या फर्स्ट लूकमध्ये सलमान काहीसा रागात दिसत आहे. त्याच्या हातात गन आहे. त्यामुळे फर्स्ट लूकवरून देखील या चित्रपटात सलमान जबरदस्त अॅक्शन करताना दिसून येईल. सलमानने या चित्रपटातील फर्स्ट लूक ट्विटरवरून शेअर केला. 

 'रेस 3' मधील आपला फर्स्ट लूक शेअर करण्यापूर्वी त्याने मधील शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यातील एक फोटो देखील शेअर केला. 

त्याचबरोबर  'रेस 3' च्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी त्याने टिमसोबतच फोटो शेअर केला. 

२००८ मध्ये आलेल्या 'रेस' या चित्रपटात सैफ अली खान, अक्षय खन्ना, बिपाशा बासु, अनिल कपूर आणि समीरा रेड्डी हे कलाकार होते. तर २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सैफ, जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण, जैकलीन फर्नांडिस, अमीषा पटेल आणि अनिल कपूर हे कलाकार दिसले होते.  'रेस 3' हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजा करत आहे.