‘फुकरे रिटर्न’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

रिचा चढ्ढाच्या भोली पंजाबन या भूमिकेमुळे गाजलेल्या ‘फुकरे’ या सिनेमाचा सिक्वेल ‘फुकरे रिटर्न’ येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय.

Updated: Nov 13, 2017, 01:18 PM IST
‘फुकरे रिटर्न’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज title=

मुंबई : रिचा चढ्ढाच्या भोली पंजाबन या भूमिकेमुळे गाजलेल्या ‘फुकरे’ या सिनेमाचा सिक्वेल ‘फुकरे रिटर्न’ येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय. आधीच्या सिनेमातील सगळी धमाकेदार कास्ट याही सिनेमात बघायला मिळणार आहे. यावेळी ही धमाकेदार कॉमेडी प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असे दिसते आहे. 

‘फुकरे रिटर्न’ या सिनेमाला मॅडनेसचा डबल डोज म्हटले जाऊ शकते. ही चार मित्रांची गोष्ट असून शॉर्टकट मार्गाने त्यांना पैसे कमवायचे आहेत. त्यासाठी ते काय काय आयडियाची कल्पना लावतात ते या सिनेमात आहे. पुलकित सम्राट, अली फजल, मनोज सिंह आणि वरूण शर्मा या सिनेमात एक खजाना शोधण्याच्या चक्करमध्ये पडले आहेत. 

येत्या १५ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन म्रिघदीप सिंह लांबा याने केलं असून कथा, पटकथा आणि संवाद विपुल विग याने लिहिली आहे. रितेश सिधवाणी आणि फरहान अख्तर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.