'टायगर'च्या शूटिंगदरम्यान Salman Khan ला आवडले नव्हते कतरिना कैफचे कपडे, म्हणाला होता 'छोटे होते आणि...'

Salman Khan On Katrina Kaif Clothes at ek tha tiger set : पलक तिवारीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सलमान खानच्या सेटवर मुलींना कपडे परिधान करण्यासाठी काही नियम असतात असे सांगितले. त्यानंतर सलमानचा कतरिना कैफविषयी बोलतानाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 15, 2023, 10:52 AM IST
'टायगर'च्या शूटिंगदरम्यान Salman Khan ला आवडले नव्हते कतरिना कैफचे कपडे, म्हणाला होता 'छोटे होते आणि...' title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan On Katrina Kaif Clothes at ek tha tiger set : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानच्या (Salman Khan) 'किसी की भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करते. तर काही दिवसांपूर्वी पलकनं सलमानच्या सेटवर मुलींसाठी असलेले कपड्यांचे नियम सांगितले होते. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी खुलासा केला होता. दरम्यान, सलमानचा एक जुना व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमुळे कतरिना कैफ (Katrina Kaif) कपड्यांचा किस्सा समोर आला आहे. त्यावर सलमान काय म्हणाला होता हे त्या व्हिडीओतून समोर आलं आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओत हा रजत शर्मा यांच्या शोमधील आहे. तर कतरिनासोबतचा सलमानचा हा किस्सा ‘एक था टायगर’ या चित्रपटातच्या शूटिंग दरम्यानचा आहे. कतरिनाचा ड्रेस आवडला नाही म्हणून सलमाननं तिला बदलण्यास सांगितले होते. रजत शर्मा यांच्या आप की अदालतमध्ये सलमाननं हजेरी लावली होती. यावेळी रजत शर्मा म्हणाले, 'तू आणि कतरिना शूटिंग करत होते, तेव्हा व्हॅनमधून खाली उतरलेल्या कतरिनानं  परिधान केलेले कपडे पाहून तुला राग आला होता, असं म्हटलं जातं.' यावर सलमान खान म्हणाला, 'ते शॉर्ट होते हे खरं आहे. पण त्याची फिटिंग खराब होती आणि कलर कॉम्बिनेशन थोडं खराब होतं. फक्त मी नाही तर बऱ्याचवेळा कतरिनासुद्धा मला सांगते की हे चांगल दिसत नाही आहे, बदलून टाक. तर त्यावेळी मी तिला म्हणालो की चांगलं दिसत नाही. कपडे बदलून ये. तर कपडे लहान होते हे त्या मागचं कारण होतं असं नाही.' 

Salman spoke about Katrina’s incident on Aap ki Adalat and that how the fitting of clothes were not right, the short clothes were not required, “jab tak humari ladkiya decently dressed hai”
by u/SugarfreeJalebi in BollyBlindsNGossip

पुढे सलमान म्हणाला, 'कतरिना स्टाईल आणि ग्रेसनं कोणताही लूक चांगल्या पद्धतीनं कॅरी करते. तसंही ते टायगरमधलं शेवटचं गाणं होतं. त्यात अशा कपड्यांची काय गरज नाही. तिथे अशा अनेक मुली होत्या ज्यांनी खूप तोकडे कपडे परिधान केले होते. जोपर्यंत आपल्या मुली सभ्यपणे कपडे परिधान करतात तोपर्यंत आपल्याला काही फरक पडत नाही.'

हेही वाचा : 'मी चांगला पती नाही...', लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी Ranbir Kapoor चा मोठा खुलासा

दरम्यान, सलमानच्या 'किसी की भाई किसी की जान' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमानसोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर या व्यतिरिक्त पलक तिवारी, शहनाज गिल, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल आणि भूमिका चावला, दाक्षिणात्य सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती यांच्या भूमिका आहेत. तर हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.